8 (पान ४ साठी)
-rat20p30.jpg-
P24M84774
नवरंग पक्षी
-rat20p31.jpg-
P24M84775
आधेलेफोक
-rat20p32.jpg-
24M84776
फुललेले कोलकांदे
--------
‘नवरंग’ देतोय पावसाची चाहूल
आधेलेफोकस कोलकांदे फुलले; कातळ परिसरात निसर्गाचे दर्शन, पर्यावरणप्रेमींना पर्यवणी
सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. २१ ः निसर्गामध्ये मुक्तपणे विहार करणारे पक्षी आणि मान्सूनच्या तोंडावर उगवणाऱ्या वनस्पती गेल्या कित्येक वर्षापासून मान्सूनच्या आगमनाची वर्दी देत आहेत. त्यामध्ये कातळ परिसरामध्ये फुललेले कोलकांदे, नवरंग (इंडीयन पिट्टा) पक्ष्याचे झालेले आगमन, पावसाच्या आगमनाची प्रतीक्षा करणाऱ्या पावशा पक्ष्याचे सातत्यपूर्ण ओरडणे यावर्षी मान्सून वेळेमध्ये दाखल होण्याची साऱ्यांना वर्दी देत आहे.
जंगल परिसरामध्ये मोठ्याप्रमाणात वाढलेला दिंडा आणि आधेलेफोक वनस्पती मान्सूनच्या आगमनाची साऱ्यांना वर्दी देत आहे. श्रीलंका ते हिमालयाचा पायथा असा स्थलांतराचा प्रवास करणारा नवरंग (इंडीयन पिट्टा) पक्ष्याचे आगमन झाले आहे. या पक्ष्याच्या आगमनानंतर साधारणतः महिनाभराच्या कालावधीनंतर मान्सूनचे आगमन होते. या पक्ष्याचे नुकतेच आगमन झाले आहे. छोटेचणीच्या या आकर्षक पक्ष्याचे ठिकठिकाणी आढळत आहे. त्याचे हे आगमन मान्सून वेळेमध्ये दाखल होण्याचे संकेत देत आहे. अशा या नैसर्गिक भागाकडे पर्यावरणप्रेमींची पावले वळू लागली आहेत.
----
कोट
निसर्गासह हवामानामध्ये सातत्याने होणाऱ्या बदलांचा अंदाज कंदवर्गीय वनस्पती, पक्षी यांना अगोदर येतो. त्यानुसार ते स्वतःच्या राहणीमान आणि वर्तमानामध्ये बदल करीत असतात. त्यांच्या या वागण्यातून निसर्गात झालेले आणि होणारे संभाव्य बदलांचे संकेत मिळत असतात. इंडीयन पिट्टा पक्ष्याचेही आगमन झाले असून तो मान्सूनच्या आगमनाचे साऱ्यांना संकेत देत आहे.
--धनंजय मराठे, पर्यावरणप्रेमी आणि अभ्यासक
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.