shivsena-ncp
shivsena-ncp esakal
कोकण

राष्ट्रवादी खासदारांविषयी सेना नेत्यांची नाराजी; महाआघाडीत बिघाडी?

सकाळ वृत्तसेवा

चिपळूण : राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे (Sunil tatkare) यांच्याविषयी शिवसेना नेत्यांमधील नाराजी वाढत चालली आहे. तटकरे समाजाचे राजकारण करत आहेत. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना आमिषे दाखवून राष्ट्रवादीत (NCP) प्रवेश करून घेत आहेत, असा आरोप शिवसेनेच्या (Shivsena leaders) नेत्यांकडून केला जात आहे. त्यामुळे कोकणात महाविकास आघाडीत बिघाडी होत असल्याचे दिसत आहे.

काही दिवसांपूर्वी दापोली विधानसभा मतदार संघातील शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश झाला. खासदार तटकरे यांनी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना आमिष दाखवून राष्ट्रवादीत प्रवेश करून घेतल्याचा आरोप शिवसेना नेते रामदास कदम (Ramdas kadam) यांनी केला. दापोली नगरपंचायतीच्या निवडणुकीत सेना आणि राष्ट्रवादीची आघाडी झाली. या निर्णय प्रक्रियेत रामदास कदम यांना डावलण्यात आले. जागा वाटपात राष्ट्रवादीला झुकते माप देण्यात आले. त्यानंतर कदम यांनी पत्रकार परिषदेत तटकरे हे रत्नागिरी जिल्ह्यातील (Ratnagiri update) शिवसेना संपवायला निघाले आहेत, असा आरोप केला. काही दिवसांपूर्वी आमदार भास्कर जाधव (Bhaskarrao jadahv) यांनीही तटकरे यांच्यावर टीकास्त्र सोडले होते. या दोघांनंतर शिवसेना आमदार महेंद्र दळवी (Mahendra dalavi) यांनीही तटकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.

शेकापचे नेते जयंत पाटील आणि तटकरे यांचेही सध्या फारसे सख्य नसल्याचे दर्शवणारे विधान पाटील यांनी काही दिवसांपूर्वी केले होते. महाविकास आघाडीचे सरकार राज्यात असताना रायगडमधील शासकीय कमिट्यांच्या नियुक्त्यांवरून वाद झाला. तेव्हा थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना हस्तक्षेप करावा लागला होता. आता या साऱ्यांत दळवी यांचीही भर पडली आहे. तटकरे यांना स्वतःच्या कुटुंबाशिवाय दुसरे काही सुचत नाही. त्यामुळे त्यांच्या शब्दांवर विश्वास ठेवू नका, असे वक्तव्य दळवी यांनी पाली नगरपंचायत निवडणूक प्रचारसभेत केले. तटकरेंच्या विरोधी नाराजी वाढत असल्याचे हे द्योतक आहे.

"महाविकास आघाडी सरकारमधील घटक पक्षांचे कार्यकर्ते कोणी फोडू नये, असे तिन्ही पक्षात ठरले आहे. दापोलीमध्ये शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश झाल्यानंतर मी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे विचारणा केली, तेव्हा हे सर्व खासदार सुनील तटकरे यांनी केल्याचे मला सांगण्यात आले. त्यामुळे तटकरे जाणूनबुजून महाविकास आघाडी सरकारमधील घटकपक्षात नाराजी वाढवत आहेत."

- रामदास कदम, शिवसेना नेते.

तटकरेंवर घराणेशाहीचा आरोप

रामदास कदमांची राष्ट्रवादीसह शिवसेनेच्याच लोकांनी गद्दार, अशी हेटाळणी केली होती. त्यावर खुलासा करत कदम म्हणाले, मी कडवट शिवसैनिक आहे. गद्दार म्हटल्याने माझ्या डोळ्यांतून पाणी आले. पण तटकरे यांनी कुणबी भवनाचे निमित्त करून शिवसेनेचे कार्यकर्ते फोडल्याचा आरोप कदम यांनी केला. आमदार जाधव यांनी तटकरेंवर घराणेशाहीचा आरोप करत, तटकरे हे माझ्यामुळे खासदार झाल्याचा दावा केला होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs LSG : अभिषेक शर्माचे SRH साठी सर्वात वेगवान अर्धशतक; 10 षटकात लखनौचं आव्हान केलं पार

Mumbai News: रुग्णवाहिका खरेदी निविदा प्रक्रिया भोवणार,उच्च न्यायालयाने घेतली दखल, भूमिका स्पष्ट करण्याचे दिले निर्देश

Mumbai Airport: तब्बल इतक्या वेळ मुंबई विमानतळ रहाणार बंद, जाणून घ्या काय आहे महत्वाचं कारण

Police Bharti 2023 : पोलिस भरतीमध्ये एकापेक्षा जास्त अर्ज केलेल्या उमेदवारांना द्यावं लागणार हमीपत्र; आदेशात नेमकं काय म्हटलंय?

Pune Crime : मतदानानंतर वारजे परिसरात गोळीबार, दोघे अल्पवयीन ताब्यात

SCROLL FOR NEXT