NDRF
NDRF Sakal
कोकण

चिपळूणमध्ये 25 जवानांसह NDRF ची टीम दाखल

मुझ्झफर खान

चिपळूण : जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा दिल्यानंतर एनडीआरएफचे पथक आज चिपळूणमध्ये दाखल झाले. 25 जवानांसह आवश्यक ती यंत्रणा घेऊन हे पथक पुणे मार्गे चिपळूणमध्ये दाखल झाली आहे. चिपळूणमध्ये पुन्हा महापूर आल्यास नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यासाठी या पथकाची मोठी मदत होणार आहे.

22 जुलैला चिपळूणमध्ये महापूर आला. त्यावेळी हजारो नागरीक पुराच्या पाण्यात अडकले होते. त्यांना वाचवण्यासाठी एनडीआरएफला पाचारण करण्यात आले. परंतु पुणे मार्गे येताना सातारा कोयना येथे या टीमला अडथळ्यांचा सामना करावा लागला. त्यामुळे तब्बल 14 तास उशिरा चिपळूणमध्ये दाखल झाली. तत्पूर्वी स्थानिक पातळीवर बचावकार्य सुरू झाले होते. एनडीआरएफची टीम उशिरा दाखल झाल्यामुळे नागरिकांकडून प्रशासनावर टीकाही झाली होती.

रत्नागिरी जिल्ह्यात 9 सप्टेंबर पर्यंत मुसळधार पाऊस आणि अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. चिपळूणमध्ये गेली 17 तास मुसळधार पाऊस कोसळत आहे शहराच्या सखल भागात पाणी भरत आहे. पावसाने विश्रांती घेतल्यानंतर पाण्याचा निचरा होत आहे. परंतु प्रशासनाने 22 जुलै च्या महापुराचा धडा घेत पूर परिस्थिती हाताळण्यासाठी नियोजन केले आहे. शहरात विभागवार नोडल अधिकार्‍यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पाणी भरण्यास सुरवात झाल्यानंतर भोंगा वाजवून सतर्कतेचा इशाराही दिला जात आहे. 22 जुलै सारखी परिस्थिती झाली तर नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यासाठी अगोदरच एनडीआरएफ ची टीम बोलण्यात आली आहे. शहरातील माटे सभागृहात एनडीआरएफच्या टीमचा मुक्काम आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde : मुख्यमंत्री झाले गुरुजी, कामियाची घेतली शाळा.. ''पुरणपोली नहीं पुरणपोळी, ठाना नव्हे ठाणे..'' Video Viral

IPL 2024, CSK vs PBKS Live Score: पंजाबचा कर्णधार सॅम करनने जिंकला टॉस, चेन्नई संघात दोन मोठे बदल; पाहा प्लेइंग-11

PM Modi Exclusive: क्लिनचिट मी दिलेली नाही.. भ्रष्टाचाराच्या लढ्यावर मोदी अजूनही ठाम, विरोधकांच्या प्रश्नाला थेट उत्तर

आणिबाणी नंतरच्या निवडणुकी नंतर वाळवा तालुक्याला लागली होती लॉटरी; नेमके काय घडले ?

Zapatlela 3 : 'झपाटलेला ३' मध्ये पुन्हा लक्ष्याच ? ; हॉलिवूडनंतर पहिल्यांदाच मराठीत प्रयोग

SCROLL FOR NEXT