need for rain in konkan 
कोकण

कोकणवासियांना पावसाची हुलकावणी ; जमिनीला पडल्या भेगा

सकाळ वृत्तसेवा

राजापूर - पावसाच्या आश्‍वासक सुरवातीमुळे शेतकर्‍यांनी दणक्यात भातलावणीच्या कामाला सुरवात केली होती. मात्र गेल्या दोन दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने शेतकर्‍यांच्या चेहर्‍यावर चिंतेचे ढग जमा झाले आहेत. लावणी करण्यासाठी काढलेली भाताची रोपे पाण्याअभावी रखरखत्या उन्हात सुकू लागली आहेत. लावणी केलेल्या भातशेतीच्या जमिनीमध्ये पाण्याअभावी भेगा पडू लागल्या आहेत. 


‘निसर्ग’चक्रीवादळाच्या साथीने पावसाने यावर्षी दमदार आणि आश्‍वासक सुरवात केली. त्यामुळे सुखावलेल्या शेतकर्‍यांनी लागलीच भातशेतीच्या कामांना सुरवात केली. भातपेरणीच्या कामासह मशागतीची कामेही लागलीच पूर्ण करून घेतली. पावसाचे सातत्य कायम राहिल्याने शेतकर्‍यांनी गेल्या काही दिवसांपासून भातलावणीच्या कामांना सुरवात केली. त्यानंतर गेल्या दोन दिवसांपासून नेहमीप्रमाणे पावसाने दडी मारली आहे. त्यामुळे भातलावणीच्या कामांना ‘ब्रेक’ लागला आहे. काही शेतकर्‍यांनी पाऊस पडेल या आशेवर लावणीसाठी भाताची रोपे काढून ठेवली आहेत. त्यांची लावणी झाली नसल्याने ती रखरखत्या उन्हामध्ये सुकून जाऊ लागली आहेत. आणखीन काही दिवस पाऊस लांबणीवर पडल्यास ती रोपे मरून जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे. दुसर्‍या बाजूला लावणी केलेल्या मळ्यांमध्ये पाण्याअभावी भेगा पडू लागल्या आहेत. लावणी केलेली रोपे सुकून मरण्याची भीती व्यक्त केली जात आहे. दडी मारलेला पाऊस आणखीन काही दिवस लांबणीवर पडल्यास त्याचा फटका भातशेतीला बसणार आहे. 

लावणीसाठी पंपाची मदत

पावसाने दडी मारल्याने शेतकर्‍यांनी भात लावणीसाठी पाणी उपलब्ध करण्याच्या उद्देशाने डिझेल वा पेट्रोल पंपाचा आधार घेतला आहे. खर्च आणि मेहनतीच्या तुलनेमध्ये उत्पन्न कमी येत असल्याने आधीच शेतीबाबत नाराजीचा सूर काढला जात आहे. त्यामध्ये पेट्रोलच्या दरामध्ये झालेल्या वाढीची भर पडली आहे. मात्र रोपे सुकू लागल्याने शेतकर्‍यांनी पंपाच्या साह्याने लावणी सुरू केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'ऑपरेशन टायगर'चा दुसरा भाग खरंच येणार? मंत्री प्रताप सरनाईक यांचा दावा की मिश्किल टिपण्णी? कैलास पाटलांबद्दल काय म्हणाले?

RBI चा मोठा निर्णय! 'ही' सुविधा वेळेआधी होणार बंद; ग्राहकांसाठी काय बदलणार? जाणून घ्या...

Ajinkya Rahane Exclusive : अजिंक्यचे भारताकडून खेळण्याचे स्वप्न पूर्ण होईल की नाही, याची भीती होती.. पण तो खचला नाही! राधिकाचे डोळे भरून आले, रहाणेने सावरले...

Devendra Fadnavis: महाराष्ट्रातील ३६,२११ कंपन्या बंद झाल्या? चर्चेवर देवेंद्र फडणवीसांचा खुलासा; शरद पवारांना सांगितलं सत्य

FDA Crime : पुण्यातील बर्गर किंगवर एफडीएची कारवाई; अकरा हॉटेलचे परवाने निलंबित

SCROLL FOR NEXT