new 173 corona patient in ratnagiri 
कोकण

ब्रेकिंग - रत्नागिरीत आज कोरोना रूग्णांची विक्रमी वाढ 

राजेश शेळके

रत्नागिरी  - जिल्ह्यात कोरोनाचा कहर तिसर्‍या दिवशीही सुरूच आहे. एका दिवसात विक्रमी म्हणजे 173 कोरोना बाधित रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे बाधितांची संख्या 4 हजार 372 झाली आहे. दिवसभरात 49 जणांनी कोरोनावर मात केली आहे. 2 हजार 883 जण बरे होऊन घरी गेले आहेत. त्यामुळे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण कालच्या तुलनेत घसरले आहे. काल 66.06 टक्के बरे होण्याचे प्रमाण होते. ते आज 65.94 झाले आहे. 

जिल्ह्यात कोरोनाने आज आणखी दोघांचा मृत्यू झाल्याने एकूण मृतांची संख्या 141 झाला आहे. गेल्या चार दिवसांपासून बाधितांची संख्या चिंता वाढविणारी आहे. दिवसेंदिवस बाधितांची संख्या आरोग्य विभागाचा ताण वाढविणारी ठरत आहे. काल जिल्ह्यात 142 कोरोना बाधित मिळाले होते. आज आकडा वाढला असून 173 रुग्ण सापडले आहेत. आरटीपीसीआरमध्ये 60, तर अ‍ॅन्टीजेन टेस्टमध्ये 113 बाधित आहेत. याध्ये सर्वाधिक बाधितांची संख्या खेड, रत्नागिरी आणि चिपळूण तालुक्यात आहे. चिपळूण- 40, लांजा- 17, गुहागर- 5, दापोली- 2, संगमेश्‍वर- 7, राजापूर- 0, खेड- 54, मंडणगड- 0, रत्नागिरी- 48, असे 173 बाधित सापडले आहेत. जिल्ह्यात दोघांचा मृत्यू झाला असून एक रत्नागिरी आणि मंडणगड येथील आहे. एकूण मृतांची संख्या 141 वर गेली आहे. 

जिल्ह्याचा मृत्यूदर कमी करण्याच्यादृष्टीने आरोग्य विभाग आणि प्रशासनाचे प्रयत्न आहे. मात्र तो वाढताना दिसत आहे. जिल्ह्यात काल 3.31 मृत्यू दर होता. तो 0.09 टक्क्याने कमी झाला आहे. 
दिवसभरात जिल्ह्यातील 49 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना घरी सोडण्यात आले. महिला रुग्णालय 19, गुहागर 11, बीएड कॉलेज 9 येथील बरे झालेले रुग्ण आहेत. 2 हजार 883 जण बरे होऊन घरी गेले आहेत. त्यामुळे बरे होण्याची टक्केवारी काल 66.06 टक्के होती, ती आज 65.94 झाली आहे. रत्नागिरी तालुक्यात सर्वाधिक रुग्ण सापडले असून त्यामध्ये नेवरे येथील एकाच गावातील 10 जणांचा समावेश आहे. रत्नागिरी शहरातील बाजारपेठेतील व्यापार्‍यांच्या केलेल्या अ‍ॅन्टीजेन टेस्टमध्ये 9 जण बाधित सापडले आहेत. आज चाचणीमध्ये निगेटिव्ह आलेल्यांची संख्या 280 आहे. 

एकूण बाधित रुग्ण -4372

एकूण निगेटिव्ह -24826

आजचे निगेटिव्ह -280

एकूण मृत-141

बरे झालेले - 2883

दाखल रुग्ण -736

संपादन - धनाजी सुर्वे
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Central Railway Special Train: प्रवासाचा प्लॅन ठरवण्याआधी वाचा! मुंबईहून कोकणात-नागपूर जाण्यासाठी विशेष गाड्या, संपूर्ण वेळापत्रक इथे पाहा

‘महाराजा’चा सीक्वेल येणार? विजय सेतुपतीचा वेगळा अंदाज पहायला मिळणार?

Satara Politics : 'साताऱ्यात दोन्ही राष्‍ट्रवादी एकत्रित निवडणूक लढणार, काही ठिकाणी काँग्रेसही राहणार सोबत'; NCP नेत्याची माहिती

Pune Flood : पुण्यात महापुराचा धोका कमी करणार; महापालिका आयुक्त नवलकिशोर राम यांची ग्वाही

Latest Marathi News Live Update : रत्नागिरी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या 168 जागांसाठी 633 उमेदवार रिंगणात

SCROLL FOR NEXT