New 27 Corona Patient In Ratnagiri One casualty  
कोकण

रत्नागिरीत कोरोनाचे नवे 27 रुग्ण ; एकाचा मृत्यू 

सकाळवृत्तसेवा

रत्नागिरी - जिल्ह्यात पुन्हा कोरोनाने डोके वर काढले आहे. सलग दुसऱ्या दिवशी जिल्ह्यात 27 नवीन कोरोना बाधित सापडले आहेत. शाळा सुरू झाल्यामुळे शिक्षकांच्या चाचण्या वाढल्या आहे. बाधितांमध्ये बहुतांशी शिक्षकांचा समावेश आहे. त्यामुळे आरोग्य विभाग सतर्क झाला आहे. लांजा येथील एका बाधिताचा मृत्यू झाल्याने मृतांची संख्या 348 झाली आहे. 

जिल्ह्यात आज सलग दुसऱ्यादिवशी कोरोनाच्या वाढलेल्या संख्येने चिंता वाढवली आहे. मात्र शाळा सुरू झाल्यामुळे शिक्षकांच्या चाचण्यांची त्यात भर पडली आहे. गेले काही दिवस आठशे ते हजारापर्यंत चाचण्यात होत आहेत. गेल्या 24 तासात 999 चाचण्या करण्यात आल्या. त्यामध्ये 27 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यामध्ये जिल्ह्यातील बहुतांशी शिक्षकांचा समावेश आहे. 

आरटीपीसीआर चाचणी 26 तर एन्टिजेन चाचणीमध्ये 1 बाधित सापडला आहे. यामध्ये रत्नागिरी तालुक्‍यातील 6, दापोली 2, चिपळूण 12, संगमेश्‍वर 6, मंडणगड 1 रुग्ण आहेत. एकूण कोरोना बाधितांची संख्या 9 हजार 540 झाली आहे. सहा जणांनी कोरोनावर मात केली आहे.

एकूण बरे झालेले रुग्ण 9 हजार 065 असून हे प्रमाण 95.02 टक्के आहे. 972 जणांचा अहवाल आज निगेटिव्ह आला असून एकूण निगेटिव्ह स्वॅबची संख्या 71 हजार 290 झाली आहे. जिल्ह्यात दुसऱ्या दिवशी लांजातील एकाचा कोरोनोमुळे मृत्यू झाला आहे. एकूण मृतांची संख्या 348 असून मृत्यूदर 3.65 झाला आहे. जिल्ह्यात विविध ठिकाणच्या कोव्हिड सेंटरवर 107 जण उपचारार्थ दाखल आहेत. 
 

 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Student Drug Prevention: शासनाचा माेठा निर्णय! शालेय समित्‍या होणार ‘नशा’विनाशक; शाळांच्या व्यवस्थापनात मुख्‍य जबाबदारी

Sharad Pawar Devendra Fadnavis सोयाबीन-कापूस करपले, पाणी-चाऱ्याचा प्रश्न गंभीर; शरद पवारांनी मुख्यमंत्री फडणवीसांकडे केल्या ९ मोठ्या मागण्या

सुरू होऊन ८ महिने नाही झाले तोच निरोप घेणार स्टार प्रवाहची मालिका? मुख्य अभिनेत्रीच्या पोस्टने चर्चेला उधाण

Marathi News Live Updates : गणपतीपुळे येथे दर्शनासाठी येणाऱ्या भक्तांसाठी अखेर वस्त्रसंहिता लागू

iPhone 18 Pro खरेदीसाठी देशभरात ग्राहकांच्या रांगा; मुंबई, दिल्ली, बंगळूरूमध्ये मोठी गर्दी

SCROLL FOR NEXT