new develop boat for disaster in konkan river in ratnagiri 
कोकण

प्रशासनाला मिळाला दिलासा ; कोकणात पूरपरिस्थितीसाठी आधुनिक पाच बोटी दाखल

सकाळ वृत्तसेवा

रत्नागिरी : अतिवृष्टीत चिपळूण, खेड, राजापूरसह रत्नागिरीत ठिकठिकाणी नद्यांना मोठ्या प्रमाणात पूर येतो. घरेच्या घरे पाण्याखाली जातात. नागरिकांच्या मदतीसाठी आपत्कालीन परिस्थितीत सुरक्षा बोटींची आवश्‍यकता भासते. ती कमी आता भरून निघाली असून, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाला पाच आधुनिक बनावटीच्या बोटी प्राप्त झाल्या आहेत. एका बोटीची किंमत सुमारे आठ लाख रुपये आहे. रत्नागिरीतील भाट्ये खाडीत त्याचे गुरुवारी प्रात्यक्षिक घेण्यात आले.

पावसाळ्यात दरवर्षी पूर परिस्थिती निर्माण होते. त्याला सामोरे जाताना जिल्हा प्रशासनाची तारांबळ उडते. दोन वर्षांपूर्वी तिवरे धरण दुर्घटनेप्रसंगी व्हाईट आर्मीची मदत घ्यावी लागली होती. पुरामध्ये मदत करण्यासाठी काही वर्षांपूर्वी आपत्ती व्यवस्थापन कक्षाने रबरच्या तीन बोटी घेतल्या होत्या. त्या खेड, चिपळूण पालिकेकडे सुपुर्द केल्या. पुराच्यावेळी मदतयंत्रणा सक्षम करण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून नवीन पाच बोटींचा प्रस्ताव पाठविला होता. त्याला मान्यता मिळाली असून नवीन बोटी रत्नागिरीत दाखल झाल्या.

पोलिस आणि आपत्ती व्यवस्थापन कक्षामार्फत रत्नागिरीतील भाट्ये खाडीत डेमो घेतला. या बोटी एचडीपी (high density polyethylene) बनावटीच्या आहेत. फायबरमधीलच हा एक प्रकार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. प्रात्यक्षिकावेळी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी अजय सूर्यवंशी यांच्यासह सुनील कीर, पोलिस निरीक्षक केळकर, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक दळवी, डगळे, कोळंबेकर, तलाठी झिटे, सरफरे, अग्निशमन विभागचे अधिकारी उपस्थित होते.


अशा वेळी भासते बोटींची गरज...

सरत्या पावसाळी हंगामात यंदा अतिवृष्टी झाली होती. चांदेराई, हरचिरी, पोमेंडी, सोमेश्‍वर या परिसरात काजळी नदीचे पाणी भरले होते. या पुराचे पाणी सोमेश्‍वरकडे जाणाऱ्या रस्त्यावर येते. अशा वेळी बोटींची गरज भासते. भविष्यात अशी परिस्थिती निर्माण झाल्यास त्यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे.

बोटींची वैशिष्ट्ये व विभागणी अशी...

  •  एकावेळी दहा व्यक्‍ती बसतील, एवढी क्षमता 
  •  बोटीचे इंजिन ३० अश्‍वशक्‍तीचे 
  •  एचडीपी बनावटीच्या बोटी 
  • आठ लाईफ जॅकेट व चार बोये आदी साहित्य ठेवणार 
  • प्राप्त बोटींपैकी खेड, चिपळूण, राजापूर पालिकेला प्रत्येकी एक 
  • रत्नागिरी तहसीलसह पोलिस प्रशासन यांनाही प्रत्येकी एक बोट

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anna Hazare : जनसेवा हीच ईश्वर सेवा,आता जोपर्यंत शरीरामध्ये प्राण आहे तोपर्यंत जनतेची सेवा करणार

Pune Crime : मैत्रिणीशी बोलत असल्याच्या रागातून स्पर्धा परिक्षेच्या विद्यार्थ्याचे अपहरण करणाऱ्या आरोपींना १५ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी

Beed Scam : बीडमध्ये ७ कोटींचा महाघोटाळा! २० वर्षांच्या भाडेपट्ट्यावरील जमिनीवर डल्ला; एसबीआयचे व्यवस्थापक, सरपंचासह ६ जणांवर गुन्हा दाखल

Maratha Reservation: अभिजित दीपके घेणार मनोज जरांगेंची भेट; तारीख अन् वेळही ठरली

Marathi News Live Updates : राजकारण ते हवामान...; एका क्लिकवर वाचा दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी

SCROLL FOR NEXT