New varieties of groundnut by Shirgaon Agricultural Research Center 
कोकण

शिरगाव कृषी संशोधन केंद्रातर्फे भूईमुगाचे नवे वाण 

नरेश पांचाळ

रत्नागिरी - शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ होण्यासाठी कोकण कृषी विद्यापीठांतर्गत शिरगाव येथील कृषी संशोधन केंद्रातर्फे भूईमुगावर संशोधन करून विविध जाती विकसित केल्या आहेत. चविष्ट आणि खाण्यास योग्य, शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ तसेच पर्यटकांना जाड-खाऱ्या शेंगदाण्याचा आस्वाद घेता यावा यासाठी भूईमुगाच्या नवीन वाणाची निर्मिती केली आहे.

शेतकऱ्यांच्या शेतावर या वाणाची चाचणी झाल्यावर लवकर हे वाण उपलब्ध होणार असल्याची माहिती कृषी संशोधन केंद्राचे प्रभारी अधिकारी डॉ. भरत वाघमोडे यांनी दिली. 

याआधी येथील कृषी संशोधन केंद्राने कोकण गौरव, कोकण टपोरा, कोकण भूरत्न आदी शेतकऱ्यांना भरघोस उत्पादन देणारी भूईमुगाची वाणे तयार केली आहेत. जिल्ह्यातील व परजिल्ह्यातील प्रगतशील शेतकरी याचा वापर करत आहेत. संशोधन केंद्राने तयार केलेल्या या भूईमुगाच्या नवीन वाणाची राज्य, राष्ट्रीय स्तरावर चाचणी झाली आहे.

फक्त शेतकऱ्यांच्या शेतावरचाचणी होणे बाकी आहे. गतवर्षी या नवीन वाणाची कृषी संशोधन केंद्रातून निर्मिती केली आहे. भुईमूग पिकास कोकणातील जमीन अतिशय पोषक आहे. देशाच्या उत्पादकतेपेक्षा कोकणातील जमिनीत दुप्पट भुईमूग उत्पन्न मिळते. खरिपात वरकस क्षेत्रात पावसाच्या सुरवातीस भुईमूग पेरणी करून बीजोत्पादन शक्‍य आहे. 

असे आहे नवे वान 

  • चार महिन्यात तयार होणारे वाण 
  • भूईमुगाच्या इतर जातीप्रमाणे या वाणाचा दाणा जाड 
  • प्रथिने तसेच उत्पादनाला जास्त मिळणारे वाण 
  • दाण्यात ऑईलचे प्रमाण कमी, खाताना त्रासही जाणवणार नाही. 
  • पर्यटक वापरासाठी उपयोग होऊ शकतो. 
  • या जातीचे नामांकन होणे बाकी 

शेतकऱ्यांनी संशोधन केद्राशी संपर्क साधावा 
भुईमूग, भातशेती याची विविध बीजोत्पादन संशोधन केंद्राने विकसित केली आहेत. ज्या शेतकऱ्यांना भात व भूईमूग याविषयी माहिती हवी असेल त्यांनी शिरगाव येथील कोकण कृषी संशोधन केंद्राशी संपर्क साधावा, असे आवाहन डॉ. वाघमोडे यांनी केले आहे. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Who was Sandu Karhale? : मराठवाडा मुक्ती संग्रामातील धगधगता तारा हरपला! ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक सांडू कऱ्हाळे यांचे वयाच्या 100 व्या वर्षी निधन, निल्लोडवर शोककळा

Gold Silver Price : सोने-चांदी झाले स्वस्त; एका दिवसात सोने ५ हजारने तर चांदी ४ हजार ९०० रुपयांनी घसरली

Latest Marathi News Update : मुंबईतील ताज हॉटेलला बॉम्बने उडवून देण्याची धमकी

Fatty Liver: भारतात झपाट्याने वाढतोय फॅटी लिव्हरचा धोका! अशी ओळखा लक्षणे...

What Action Will Tukaram Mundhe Take? बनावट दूध पावडरचे मोठे रॅकेट अन् अधिकाऱ्यांचे हात गुंतल्याचा संशय; सिन्नरमधील 'त्या' घोटाळ्याची मुंढेकडे लेखी तक्रार, काय कारवाई होणार?

SCROLL FOR NEXT