NGO masu Demand for Proposal sent to UGC kokan marathi news 
कोकण

सेमिस्टरच्या गुणांच्या सरासरीद्वारे गुण द्यावे ; ‘मासू’ची मागणी

मकरंद पटवर्धन

रत्नागिरी : कोविड -19 विषाणूच्या धर्तीवर परीक्षेसंबंधी महाराष्ट्र स्टुडंट्स युनिययने (मासू) केंद्रीय अनुदान आयोगाकडे (युजीसी) प्रस्ताव दिला आहे. विद्यार्थ्यांनी आतापर्यंत उत्तीर्ण केलेल्या सर्व सेमिस्टरच्या गुणांची सरासरी विचारात घ्यावी. वार्षिक परीक्षा किंवा सेमिस्टर परीक्षा घेण्याऐवजी त्यांच्या अगोदरच्या सर्व सत्रांचे गुण एकत्रित करून त्यांची सरासरी करून वार्षिक परीक्षा किंवा पुढच्या सेमिस्टरसाठी गुण प्रदान करण्याची मागणी केली आहे.
युजीसीने परीक्षेबाबत निर्णय घेण्यासठी समिती गठीत केली आहे. त्यासंदर्भात मासूने ईमेलद्वारे काही सूचना पाठवल्या आहेत.

पदवीधर अभ्यासक्रमात मागील सर्व वर्षांची किंवा सेमिस्टरच्या गुणांची सरासरी काढून पुढील प्रलंबित परीक्षेसाठी सरासरी गुण प्रदान करावी. शैक्षणिक व प्रशासकीय सुधारणांकरिता युजीसीच्या कृती योजना 2009 नुसार विविध राज्ये विद्यापीठांनी चॉईस बेस्ड क्रेडिट सिस्टम आणि ग्रेडिंग सिस्टम, 9 पॉईंट पॉईंट स्केल आणि संचयीत ग्रेड पॉइंट स्कोअर लागू केलेल्या आहेत. योग्य वेळी सेंट्रलाइज्ड अ‍ॅडमिशन प्रोसेस आयोजित करावी म्हणजे विद्यार्थ्यांना प्रवेश घेता येईल. अंतिम वर्षाच्या गुणांवर गुणवत्ता यादी तयार केली जावी. सेंट्रलाइज्ड अ‍ॅडमिशन प्रोसेसनुसार विद्यार्थ्यांना प्रवेश द्यावा.मासूचे संस्थापक अध्यक्ष अ‍ॅड. सिद्धार्थ इंगळे यांनी सांगितले.

युजीसीकडे पाठवला प्रस्ताव

बर्‍याच विद्यार्थ्यांनी वसतिगृह सोडले आहे. अनेक महाविद्यालयांमध्ये अभ्यासक्रमही पूर्ण नाही. परीक्षेबाबत घाईचा निर्णय घेतल्यास विद्यार्थ्यांना मानसिक, आर्थिक आणि शारीरिक त्रास सहन करावा लागू शकतो. विविध विद्यापीठांमध्ये विद्यार्थ्यांचे पुनर्मूल्यांकन निकाल अद्याप बाकी आहे. परीक्षा महत्त्वाच्या नसून प्रश्‍नपत्रिकांचे मूल्यांकन, निकाल, पुढील वर्षासाठीची प्रवेश प्रक्रियाही महत्त्वाची आहे. कुलगुरू समितीशी बोलणे झाले आहे. सातत्याने पाठपुरावा करूनही आम्हाला कोणताही अभिप्राय अजून मिळालेला नाही किंवा योग्य चर्चा होण्याची संधी मिळाली नाही.मासू संघटना ही विद्यार्थी न्याय, हक्क आणि अधिकारांसाठी कार्यरत आहे. मे महिन्यात महाराष्ट्रातील टाळेबंदी जरी उठविली गेली तरी परिस्थिती सामान्य होण्यास अजून काही महिने तरी लागतील, असे मासूचे उपाध्यक्ष सुनील देवरे यांनी व्यक्त केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Rain: मुंबईला पुढील 48 तास धोक्याचे! गणरायाच्या आगमनापूर्वी पावसाचा अलर्ट, हवामान खात्याकडून मोठी अपडेट

US Open Final: अल्काराझला हरवलं, टियाफोलाही धुतलं! बेन शेल्टन US Openच्या फायनलमध्ये; २२ वर्षांनंतर अमेरिकेचा खेळाडू इतिहास रचणार?

BRICS Dinner: शी जिनपिंग मोदींच्या मेजवानीला गैरहजर; पुतिनसह ब्रिक्स नेत्यांनी घेतला भारतीय शाकाहारी पदार्थांचा आस्वाद, मेनू काय होता?

Pune Kolhapur Highway Traffic : गणेशोत्सवाच्या गर्दीने खंबाटकी घाटात वाहतूक कोंडी; पाच तासांचा प्रवास दहा तासांवर

Farmer Loan Waiver: शेतकऱ्यांसाठी मोठी गुड न्यूज! सांगलीतील ४ हजार ९९ लाभार्थ्यांची दुसरी कर्जमाफी यादी प्रसिद्ध

SCROLL FOR NEXT