nilesh rane criticized on CM uddav thakre on the topic of speech in assembly in sindhudurg 
कोकण

विधानसभेतील मुख्यमंत्र्यांच्या भाषणावर निलेश राणेंची सडकून टीका

सकाळ वृत्तसेवा

सिंधुदुर्ग : मागील तीन दिवसापासून राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सभागृहात भाषण केले. त्यांनी भाषणात विविध मुद्द्यांवर चर्चा केली. यामध्ये शेतकरी आंदोलन, कोरोना काळात वाटप करण्यात आलेलं धान्य, महाराष्ट्र बेळगाव सीमाप्रश्न, सावरकर यांच्याबाबतचा भारतरत्नचा मुद्दा, हिंदुत्त्वाचा मुद्दा, औरंगाबादचे नाव संभाजीनगर करण्याबाबतचा मुद्दा या विषयांवर त्यांनी भाष्य केले. मात्र भाषणानंतर विरोधकांनी त्यांच्यावर टीकेची झोड उठवली. 

दरम्यान भाजपाचे निलेश राणे यांनीही ट्वीट करुन मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला. ते म्हणाले, नेहमीप्रमाणे मुख्यमंत्र्यांनी सभागृहात भाषण केले आहे. यांना मु़द्द्याला धरुन बोलता येत नाही. हे महाराष्ट्राचे दुर्देव म्हणावे लागले की राज्याच्या जनतेला अशा व्यक्तीला सहन करावे लागत आहे. अशी खरमरीत टीका त्यांनी केली आहे. 

यावेळी आणखी एका मु्द्द्यावरुन निलेश राणे यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला. ते म्हणाले, मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत भारतीय जवानांचा अपमान केला आहे. 'चीनसमोर पळ काढला' असं वादग्रस्त विधान केले आहे. जवानांचा अपमान आम्ही सहन करणार नाही. ताबडतोब त्यांनी जवानांची माफी मागावी.

काय म्हणाले मुख्यमंत्री 

'बाबरी मशीद प्रकरणानंतर पळ काढणाऱ्यांनी शिवसेनेला हिणवू नये, आमचं हिंदुत्व केवळ शेंडी अन् जानव्याचे नाही,' असे आक्रमक उत्तर देत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज भाजपला विधानसभेत लक्ष्य केले. सरकारवर जरुर टीका करा पण, महाराष्ट्राची बदनामी करु नका. राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेला उत्तर देताना ठाकरे यांनी विरोधी पक्षाच्या आरोपांची व टीकेची खिल्ली उडवली. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Government Officer Mobile Video : खासदारांच्या काजू-बदामनंतर आता अधिकाऱ्यांचा असंवेदनशील चेहरा; कृषिमंत्र्यांच्या दुष्काळ आढावा बैठकीत मोबाईलमध्ये दंग

Kannad Teacher Credit Society: आमसभेत आर्थिक अनियमिततेचे आरोप; चर्चा सुरू असतानाच राष्ट्रगीताने सभा गुंडाळल्याचा दावा

Martyr Wife Success Story: १८ वर्षांपूर्वी पती गमावला; आज त्याच वर्दीत देशसेवेची जबाबदारी, वीरपत्‍नी कल्पना पवारांचा संघर्षमय अन् प्रेरणादायी प्रवास..

Marathi News Live Updates : भारत आणि जपानच्या हवाई दल प्रमुखांचे 'तेजस'मधून उड्डाण

India Pakistan Passports : अंबरनाथमध्ये एकाच व्यक्तीकडे भारत-पाकिस्तानचे पासपोर्ट; मुंबई ATS कडूनही चौकशी सुरू

SCROLL FOR NEXT