nilesh rane criticized on state government topic of pooja chavan in sindhudurg 
कोकण

'त्यांचा राजीनामा घेण्याची हिंमत आणि धाडस मुख्यमंत्र्यामध्ये नाही' ; निलेश राणेंची टीका

सकाळ वृत्तसेवा

सिंधुदुर्ग : टिकटॉक स्टार पूजा चव्हाण हिच्या आत्महत्येनंतर राज्यातील एका मंत्र्याचे नाव या प्रकरणात जोडले गेल्यानं राजकीय आरोप प्रत्यारोप केले जात आहेत. याप्रकरणी राज्यसरकारवर विरोधकांनी टीकाही केली आहे. भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी पुण्यात घटनास्थळी भेट घेतल्यानंतर पत्रकार परिषद घेतली. यामध्ये पुन्हा एकदा त्यांनी राज्य सरकारला धारेवर धरलं आहे. दरम्यान, यावरूनच निलेश राणे यांनीही राज्य सरकारवर टीकास्त्र सोडेले.

पुजा चव्हाण प्रकरणावरुन निलेश राणे यांनी आपल्या ट्वीटच्या माध्यमातून राज्यसरकार आणि मुख्यमंत्र्यावर निशाणा साधला. ठाकरे सरकार संजय राठोडला वाचवत आहे. सगळ्या बाजूने अडकलेला संजय राठोड शक्तिप्रदर्शन करतो आहे. कॅबिनेट मीटिंगमध्ये बसतो पण तरीही त्याचा राजीनामा घेण्याची हिंमत आणि धाडस मुख्यमंत्र्यामध्ये नाही. परत मुख्यमंत्र्यानी कधीही स्वतःच्या भाषणात म्हणू नये की 'मी मर्द आहे.' असे म्हणत त्यांनी मुख्यमंत्र्यावर टिकेची झोड उमटवली आहे.

पुढे ते म्हणाले, पूजा चव्हाण हत्या प्रकरणामध्ये चित्राताई वाघ वानवडी पोलीस स्टेशनला जाब विचारण्यासाठी गेल्या होत्या. पोलिसांनी त्यांना दिलेली वागणूक बघून आश्चर्य वाटलं. एक गुन्हेगार मंत्र्याला वाचवण्यासाठी पोलिस किती तत्पर आहेत यावरून लक्षात आलं. अशी दुहेरी टिका त्यांनी आपल्या ट्वीटद्वारे केली आहे. 

काय म्हणाल्या चित्रा वाघ ?

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात पोलिसांची भूमिका हाताची घडी घालून गप्प बसल्यासारखी आहे. वानवडी पोलिसांचा रगेलपणा दिसून आला, त्यांना ही केस दडपण्यासाठीच तिथं बसवण्यात आलं आहे. असे पोलिस अधिकारी मी पाहिले नाहीत. मुंबई आणि महाराष्ट्र पोलिसांचा सर्वांना अभिमान वाटतो पण त्यालाच काळीमा फासण्याचं काम केलं जात आहे. गप्प बसणाऱ्या या पोलिसांचा सूत्रधार वेगळाच आहे. कोणी काय केलं, विचारलं तर आम्ही बघून घेतो असंच त्यांना सांगितलं जात असावं. घटनेला 17 दिवस झाले तरी गुन्हा दाखल झालेला नाही. लेखी आदेश नसल्याचं म्हटलं जात आहे. तु्म्हाला कोणाचा आदेश हवा. कसल्या आदेशाची वाट बघताय असा प्रश्नही चित्रा वाघ यांनी उपस्थित केला. तुम्ही सुमोटो तक्रार दाखल करून घेऊ शकता मग तसं करण्यात काय अडचण आहे असंही चित्रा वाघ यांनी पत्रकार परिषदेत विचारले आहे.

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapuri Jaggery Crisis : कोल्हापुरी गुळाचा ब्रँड धोक्यात? गुऱ्हाळघरे बंद पडण्याच्या मार्गावर; एका आदणावर शेतकऱ्याला होतोय तब्बल 2 हजार रुपयांचा तोटा

मग काय करणार? गणपती विसर्जनावेळी चक्क साडी नेसून नदीत पोहली मराठमोळी गायिका; Video पाहून तुम्हीही थक्क व्हाल

Ajintha ST Accident: अजिंठ्यात एसटी बसचा थरारक अपघात; ट्रेलरला मागून धडक, २० हून अधिक प्रवासी जखमी

Latest Marathi News Live Update : टीएमसीच्या पक्ष आणि चिन्हाबाबतचा वाद तीन महिन्यात निकाली काढण्याचे निवडणूक आयोगाला सुप्रीम कोर्टाचे निर्देश

पाणी देता का पाणी? नसेल तर गाव विकायचंय, आम्ही कर्नाटकात जातो; सोलापूर, सांगलीतले गावकरी आक्रमक

SCROLL FOR NEXT