nilesh rane criticized on the statement of MP vinayak raut in ratnagiri 
कोकण

'विकासकामांमध्ये शिवसेना नापास'

सकाळ वृत्तसेवा

रत्नागिरी : निवडणूक ग्रामपंचायतीची आणि टीका राणेंवर या विषयावरूनच शिवसेनेने ग्रामपंचायत पातळीवर काहीच विकासकामे केलेली नाहीत, हेच स्पष्ट होते. विनायक राऊतांनी फक्‍त आरोप करण्याचाच अजेंडा उचलला असून ते विकृत आहेत, असा पलटवार माजी खासदार नीलेश राणे यांनी केला. 
चिपळूण येथे खासदार राऊत यांनी नारायण राणेंवर केलेल्या टीकेला नीलेश राणे यांनी उत्तर दिले आहे. 

ग्रामपंचायत निवडणूक प्रचारासाठी सध्या ते रत्नागिरी, संगमेश्‍वर तालुक्‍यात दौऱ्यावर आहेत. ते म्हणाले, स्वतः काहीच केले नाही, पण दुसरा करतोय, ते पाहवत नाही. राऊतांना राणे नको, नाणार नको. यांच्यामुळेच महामार्गात घोळ झालेला आहे. राऊतांनी एक जरी विकासकाम केले असते, तर आज राणेंवर टीका करायची गरज पडली नसती. शिवसेनेत जे काय चालले आहे, त्यामुळे प्रतिमा बिघडलीय. अनेकजणं निवडून येतील की नाही, याची भीती वाटत आहे. विकासकामांमध्ये शिवसेना नापास झालेली आहे. 

गावागावात गाठीभेटींचे सत्र 

पालकमंत्री, खासदार, आमदारांनी रत्नागिरी जिल्हा दिवाळखोरीत नेला आहे. प्रत्येक गावागावांत रस्ते खराब आहेत; मात्र शासनाकडे रस्ते दुरुस्तीसाठी पैसे नाहीत, अशी टीकाही नीलेश राणे यांनी केली आहे. नीलेश राणे यांनी रत्नागिरी तालुक्‍यातील बसणी, वाटद, खंडाळा, नेवरे, वरवडे, चाफे, जाकादेवी, खेडशी या गावात गावभेटी घेऊन उमेदवार, प्रतिष्ठित ग्रामस्थ यांना निवडणूक अनुषंगाने मार्गदर्शन व सूचना दिल्या. 

राउतांनी बालवाडी तरी आणली का? 

ते म्हणाले, कोकणात राणेंनी मेडिकल कॉलेज आणले, उद्योग आणले, अनेकांना रोजगार मिळवून दिला. विनायक राउतांनी बालवाडी तरी आणली का? राऊतांना फक्‍त राणेंवर बोलण्यासाठीच पाठवले आहे. त्या पलीकडे त्यांची पात्रता नाही. मागील निवडणुकीत ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लाटेमुळे निवडून आले होते. ज्यांनी काहीच केलेले नाही, ते मेडिकल कॉलेज, शिक्षण संस्थेबद्दल कसे चांगले बोलणार. 

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lalbaugcha Raja Visarjan 2026 : लालबागच्या राजाच्या विसर्जनाला यंदाही होणार विलंब? गिरगाव चौपाटीवरील 'त्या' नैसर्गिक कारणामुळे वाढली चिंता; प्रशासनासमोर मोठं आव्हान

‘आईला सोडून कसा जाऊ? आधी तिला बाहेर काढतो’... शेवटपर्यंत झुंजला, अखेर बस आगीत माय-लेकाचा मृत्यू; अंगठीवरून पटली ओळख

‘तुम्हाला काय प्रॉब्लेम?’ सततच्या चर्चांवर गोविंदांचा सवाल; म्हणाला...‘माझ्या खासगी आयुष्याचा तमाशा करू नका’

Latest Marathi News Live Update : मुंबईत विसर्जन मिरवणुकीत दुर्घटना; प्रभादेवीत भरधाव कार थेट गर्दीत घुसली, चार जणांना दुखापत

Gyanesh Kumar Padma Bhushan : 'ज्ञानेश कुमार यांना पद्मविभूषण पुरस्कार द्या'; भाजप प्रदेशाध्यक्षांनी केली मागणी

SCROLL FOR NEXT