nilesh rane criticized on vaibhav naik on the topic of assembly meeting in sidhudurg 
कोकण

'दरवाजावर दरबानसारखे नमस्कार करायला उभे राहणाऱ्या वैभव नाईक यांना बॉडीगार्डनेच केले बाजूला'

सकाळ वृत्तसेवा

सिंधुदुर्ग : आज विधीमंडळ अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा पहिला दिवस होता. हे अधिवेशन आजपासून दहा दिवस चालणार आहे. काल वनमंत्री संजय राठोड यांचा राजीनामा घेतला तरी पहिल्याच दिवशी विरोधी पक्षाने राज्यसरकाराला विविध मुद्यांवरुन धारेवर धरले. राज्यात कोरोना काळात जनतेला आलेली वाढीव बिले, वीजतोडणी, साडेतीन लाख लोकांना वीज तोडणी बाबत पाठवण्यात आलेल्या नोटीस या मुद्दयांवरुन सत्ताधाऱ्यांना लक्ष केले. 

दरम्यान भाजपाचे निलेश राणे यांनीही आपल्या ट्वीटद्वारे वैभव नाईक यांच्यावर टीका केली आहे. ते म्हणाले, वैभव नाईक परत एकदा विधानसभेच्या दरवाजावर बाजूला फेकले गेले आहेत. मुख्यमंत्री ठाकरे आत येताना विधिमंडळाच्या दरवाजावर दरबान सारखे नमस्कार करायला उभा राहणारे वैभव नाईक यांना मुख्यमंत्र्याच्या बॉडीगार्डने बाजूला ढकलले आहे अशी खोचक टीप्पनी निलेश राणे यांनी केली आहे. 

दरम्यान यंदाचे अधिवेशन हे दहा दिवसाचे आहे. या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा कालावधी १ ते १० मार्च पर्यंतचा आहे. ८ मार्चला राज्याचा अर्थसंकल्प सादर होणार असून ९ आणि १० मार्चला बजेटवर चर्चा होईल. त्यानंतर अधिवेशन समाप्त होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PBKS vs RR Live: दे दणादण! वैभव सूर्यवंशीने पंजाबच्या गोलंदाजांचा केला पालापाचोळा; ८ चेंडूंत ४२ धावा, IPL 2026 मध्ये रचला इतिहास

Pune News : १०० दिवसात नागरी हितापेक्षा भ्रष्टाचाराला प्राधान्य; सत्ताधारी भाजपवर काँग्रेसची टीका

यवतमाळ हादरलं! अनैतिक संबंधाच्या संशयातून तरुणाचा झोपेतच गेम; छतावर चढून कुर्‍हाडीने सपासप वार

विधान परिषदेसाठी भाजपकडून ६ उमेदवारांची घोषणा, कुणाला मिळाली संधी? वाचा यादी...

Harihar Panchamasali Math Controversy : पंचमसाली मठात हायव्होल्टेज ड्रामा! वचनानंद स्वामी आणि ट्रस्टींमध्ये जुंपली; कोट्यवधींच्या हिशेबावरून तीव्र वाद

SCROLL FOR NEXT