Nilesh Rane esakal
कोकण

'...तर रस्त्यात गाड्या फोडणार, गोमातेसाठी प्रसंगी कायदा हातात घेऊ, शेवटचंच सांगतोय'; नीलेश राणेंचा थेट इशारा

एका गाडीतून गोमांसाचे अवशेष रस्त्यावर पडतात. मनाला अतिशय वेदना देणारा हा कालचा प्रकार आहे.

सकाळ डिजिटल टीम

'जर दहा दिवसात हे प्रकार थांबवले नाहीत तर गाड्या आम्ही थांबवणार, त्या फोडणार आणि जिथे ही कत्तल चालते ते स्पॉट आम्ही उद्ध्वस्त करणार.'

रत्नागिरी : एका गाडीतून गोमांसाचे अवशेष रस्त्यावर पडतात. मनाला अतिशय वेदना देणारा हा कालचा प्रकार आहे. हा विषय लावून धरणाऱ्या गोसेवकांचे मनापासून कौतुक करतो; पण आज विनंती करतो परत करणार नाही. १० दिवसांत हे प्रकार थांबले नाही तर आम्ही थांबवून गाड्या फोडणार. गोमातेसाठी अंगावर गुन्हे घेऊ. प्रशासनाला शेवटचं सांगतो, हे थांबले नाही तर कायदा हातात घेणार, असा थेट इशारा माजी खासदार नीलेश राणे (Nilesh Rane) यांनी दिला.

रत्नागिरीनजीक मिरजोळे एमआयडीसी येथे काल रात्री गोमांसाचे अवशेष रस्त्यावर पडल्याने एकच खळबळ उडाली. या प्रकारानंतर भाजप नेते माजी खासदार नीलेश राणे आक्रमक झाले. एमआयडीसी-तील प्लॉट क्र. ४४ वर गुरुवारी रात्री गोमांसाचे अवशेष रस्त्यावर पडलेले दिसून आले. त्यानंतर रत्नागिरीतील नागरिक आक्रमक झाले.

दोषींवर कारवाई झाली पाहिजे आणि हे प्रकार तत्काळ बंद झाले पाहिजेत, अशी मागणी करत शुक्रवारी पहाटेपर्यंत रत्नागिरी ग्रामीण पोलिस ठाण्यात (Ratnagiri Rural Police Station) हजारो रत्नागिरीकर एकत्र आले होते. या सगळ्या प्रकारची दखल आता भाजप नेते माजी खासदार राणे यांनीही घेतली आहे. याबाबतची प्रतिक्रिया देणारा व्हिडिओ त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट केला.

राणे म्हणाले, मिरजोळेतील हा प्रकार मनाला वेदना देणार आहे. रत्नागिरीमध्ये हे प्रकार गेली अनेक वर्षे सुरू आहेत. हे सगळं जर प्रशासनाला माहिती आहे तर त्यावर कारवाई का होत नाही? पोलिसांना सर्व मार्ग माहिती आहेत. हे प्रकार कोण करतं हेही माहिती आहे. मग इतके दिवस हे प्रकार थांबवले का जात नाहीत? त्यावर कारवाई का होत नाही? असा सवाल राणे यांनी उपस्थित केला. जर दहा दिवसात हे प्रकार थांबवले नाहीत तर गाड्या आम्ही थांबवणार, त्या फोडणार आणि जिथे ही कत्तल चालते ते स्पॉट आम्ही उद्ध्वस्त करणार. पोलिसांनी तत्काळ कडक कारवाई केली नाही तर गोमातेच्या रक्षणासाठी आम्ही कायदा हातात घेणार, असा थेट इशारा राणे यांनी दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs NZ 2nd ODI Live : आकिब नबीने विश्वास सार्थ ठरवला... किवींना ११ धावांत २ धक्के; KL Rahul चा अविश्वसनीय झेल Video Viral

Bala Nandgaonkar: विकसकाच्या बाऊन्सर्सचा बंदोबस्त करा; बाळा नांदगावकर; पिंगुळी पाझर तलाव, सासोली जमीन घोटाळाप्रश्‍नी आक्रमक

Pune Markets: दिवाळीनिमित्त व्यापारी पेठा गजबजल्या ;नवीन खतावण्यांची खरेदी; विविध दुकानांमध्ये आकर्षक विद्युत रोषणाई

Latest Marathi News Live Update : शरद पवार यांना आज रुग्णालयातून डिस्चार्ज; सकाळी १० वाजता ब्रीच कँडी रुग्णालयातून घरी सोडण्यात येणार

Amba Ghat Tunnel Project : आंबा घाटाला मिळणार बोगद्याचा पर्याय! कागल ते रत्नागिरी प्रवास आता अवघ्या एका तासात; प्रकल्प अहवाल तयार करण्याची मंत्री गडकरींकडून सूचना

SCROLL FOR NEXT