Nine people innocent in murder of Mukadam Tulsani ratnagiri konkan sakal
कोकण

रत्नागिरी : तुळसणीतील मुकादमच्या खुनातील नऊ जण निर्दोष

राजू मुकादम यांची गरम पाणी अंगावर ओतून हत्या केल्याच्या आरोपातून नऊ जणांची न्यायालयाने निर्दोष मुक्तता

सकाळ वृत्तसेवा

रत्नागिरी : तुळसणी (ता. संगमेश्वर) येथील राजू मुकादम यांची गरम पाणी अंगावर ओतून हत्या केल्याच्या आरोपातून नऊ जणांची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या जबाबातील विसंगती, संबंधित महिलेने अतिप्रसंगातून वाचण्यासाठी किंवा स्वसंरक्षणासाठी मुकादमच्या अंगावर पाणी ओतले, असा निष्कर्ष नोंदवून न्यायालयाने हा निकाल दिला.

सादीक हुसेन कापडी, मकसूद मुकादम, तन्वीर मुकादम, मुआज्जम रज्जाक मुकादम, जलाल बोट, आसरीन मुकादम, फियदोस कापडी, संदीप पवार, विकास पवार, अशी निर्दोष सुटलेल्या नऊ जणांची नावे आहेत. ही घटना २७ मार्च २०१८ ला घडली होती. अनैतिक संबंधाच्या संशयातून राजू मुकादम यांचा खून करण्यात आला, असा आरोप नऊ जणांवर ठेवण्यात आला होता. २७ मार्चला राजू मुकादम दुचाकीवरून तुळसणी ते कातकरीवाडी रस्त्याने मुस्लिम मोहल्ला येथे घरी जात होता. या संधीचा फायदा घेऊन संशयितानी दुचाकी अडवून त्याच्या तोंडावर रुमाल बांधून संशयितांपैकी एकाच्या घरात घेऊन गेले होते. त्या ठिकाणी राजूचे हातपाय बांधून त्याला लाथा बुक्यानी मारहाण करण्यात आली होती. त्यानंतर त्यांच्या अंगावर गरम पाणी ओतून त्याला गंभीर जखमी करण्यात आले. त्यानंतर उपचार दरम्यान त्याचा मृत्यू झाला,अशी तक्रार दाखल करण्यात आली होती. या खटल्यात दोन्ही बाजूचा युक्तीवाद पूर्ण झाला. खटल्यात चार वैद्यकीय अधिकाऱ्यांची साक्षही नोंदवण्यात आली होती.

अंतिम निर्णय देताना न्यायालयाने प्रत्यक्षदर्शींच्या जबाबातील विसंगती, अतिप्रसंगातून वाचण्यासाठी या प्रकरणातील महिलेने स्वसंरक्षणार्थ अंगावर पाणी ओतल्याचा प्रयत्न योग्य वाटतो, असा निष्कर्ष नोंदलला. त्यामुळे खटल्यातील नऊ आरोपीची हत्येच्या आरोपातून निर्दोष मुक्तता केली. आरोपीं पक्षातर्फे अॅड. एन. जी. गवाणकर, अॅड. प्रदीप नेने, अॅड. प्रफुल्ल दामले, अॅड. शितिन दामले , क्षितिज दामले, अॅड. मधूरा आठल्ये, अॅड. शरमद मुळ्ये, अॅड . प्रवीण सुर्वे, अॅड. व्ही. एस. गर्दे, अॅड . महेंद्र मांडवकर यांच्यासह अॅड . श्रुती कांबळे, अॅड. चिन्मय बोरकर, अॅड. विश्वनाथ दापके यांनी काम पाहिले.

जबाबावर प्रश्‍नचिन्ह

या खटल्यात बचाव पक्षाकडून राजू मुकादम याचा मृत्यूपूर्व जबाब, वैद्यकीय साक्षीपुरावा, तसेच साक्षीदारांचा जबाब यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले होते. संशयित आरोपी यांचा राजूला मारण्याचा हेतू नव्हता. त्यामुळे खूनाचे कलम हटविण्यात यावे, अशी मागणी बचाव पक्षाकडून करण्यात आली होती. तसेच आसरीन मुकादम हिने स्वतच्या बचावासाठी गरम पाणी राजू याच्या अंगावर उडविले, असा बचाव केला होता. सरकारी पक्षाकडूनही जोरदार युक्तीवाद करण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 GT vs RR : १२ चेंडूंत ४ विकेट्स! रवी बिश्नोई, तुषार देशपांडेने गुजरातचा विजयाचा घास पळवला; राजस्थान Point Table मध्ये टॉपर

Strait of Hormuz: ''होर्मुजची सामुद्रधुनी खुली करण्यासाठी ४८ तासांचा अल्टिमेटम, नाहीतर भीषण परिणाम...'' थेट इशारा

Solapur Awareness Ride: मंगळवेढ्यात महात्मा बसवेश्वर आंतरराष्ट्रीय स्मारकासाठी जन्मभूमी ते कर्मभूमी सायकल यात्रा; जनजागृती उपक्रमांना उत्स्फूर्त प्रतिसाद

विहीर रस्त्याच्या मधोमध, कठडा मोठा असता तर दुर्घटना टळली असती; CM फडणवीसांनी दुर्घटनेवर व्यक्त केलं दु:ख

विद्यार्थिनींसाठी आनंदाची बातमी! आता मुलींना दरमहा ५०० रुपयांची शिष्यवृत्ती मिळणार, पण कोणाला? जाणून घ्या...

SCROLL FOR NEXT