रत्नागिरी - बारावी परीक्षेचा रत्नागिरी तालुक्याचा निकाल 92.14 टक्के लागला. यामध्ये 375 विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्य मिळवले असून तीन कनिष्ठ महाविद्यालयांचा निकाल 100 टक्के लागला. तालुक्यातील 4209 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यापैकी 3942 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. 1545 विद्यार्थ्यांनी प्रथम श्रेणी, 1920 विद्यार्थ्यांनी द्वितीय श्रेणी व 102 विद्यार्थी पास क्लासमध्ये उत्तीर्ण झाले.
चाफे येथील सुनील मुरारी मयेकर कनिष्ठ महाविद्यालयाचा निकाल 100 टक्के लागला. 30 विद्यार्थी कला शाखेत तर वाणिज्य 40 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. मालगुंड येथील मोहिनी मुरारी कनिष्ठ महाविद्यालयातील कला शाखेतील 56 व वाणिज्य शाखेतील 46 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. निकाल 100 टक्के लागला आहे. जयगड कनिष्ठ महाविद्यालयाचा निकाल 100 टक्के लागला. कला शाखेतील 18 विद्यार्थी आणि वाणिज्य शाखेतील 18 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. नवनिर्माण महाविद्यालयाचा निकाल 89.41 टक्के लागला असून, विज्ञान शाखेतील 91 पैकी 84, कला शाखेतील 75 पैकी 60 आणि वाणिज्य शाखेतील 108 पैकी 101 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. रत्नागिरीतील अभ्यंकर-कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालयाचा निकाल 91.53 टक्के लागला आहे. विज्ञान शाखेतील 591 पैकी 523, कलाशाखेतील 343 पैकी 299 व वाणिज्य शाखेतील 425 पैकी 422 असे एकूण 1359 पैकी 1244 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
व्यावसायिक अभ्यासक्रमाचा निकाल 100 टक्के लागला. वि. स. गांगण ज्युनिअर कॉलेजचा निकाल 95.04 टक्के लागला आहे. विज्ञान शाखेतील 45 पैकी 42, कला शाखेतील 124 पैकी 116 व वाणिज्य शाखेतील 73 पैकी 72 असे एकूण 242 पैकी 230 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. विजू नाटेकर ज्युनिअर कॉलेजचा निकाल 93.89 टक्के इतका लागला आहे. विज्ञान शाखेतील 65 पैकी 57, कला शाखेतील 89 पैकी 80 आणि वाणिज्य शाखेतील 157 पैकी 155 असे एकूण 311 विद्यार्थ्यांपैकी 292 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, एकूण टक्केवारी 93.89 एवढी आहे. तंत्रनिकेतनचा निकाल 95.83 टक्के लागला. शिवारआंबेरे येथील लोकनेते शामराव पेजे कनिष्ठ महाविद्यालयाचा निकाल 96.42 टक्के लागला. विज्ञान 100 टक्के, कला 90.32 व वाणिज्य 98.11 टक्के लागला.
पावस येथील मुराद उमर मुकादम कनिष्ठ महाविद्यालयाचा निकाल 78.72 टक्के लागला. विज्ञान शाखा 76.47 टक्के, कला 85 व वाणिज्यचा निकाल 78.26 टक्के लागला. नाणिज येथील माध्यमिक विद्यामंदिरचा निकाल 94.23 टक्के लागला. कला 90.32 टक्के, वाणिज्य 100 टक्के लागला. आर. बी. शिर्के कनिष्ठ महाविद्यालयाचा निकाल 93.33 टक्के लागला. विज्ञान 90.37 टक्के, वाणिज्य 95.83 टक्के लागला. खेडशी येथील श्री महालक्ष्मी उच्च माध्यमिक विद्यालयाचा निकाल 98.96 टक्के लागला. कला शाखा 93.33 टक्के व वाणिज्य शाखा 100 टक्के लागला. जाकादेवी येथील तात्यासाहेब मुळ्ये माध्यमिक विद्यालयाचा निकाल 98.31 टक्के लागला. विज्ञान 96.77 टक्के, कला 97 व वाणिज्य 100 टक्के लागला. पावस येथील देसाई विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालयाचा निकाल 95.78 टक्के लागला. विज्ञान 100 टक्के, कला 90.58 व वाणिज्य शाखेचा निकाल 100 टक्के लागला. टेंभ्ये येथील बा. रा. हातिसकर स्कूल व कनिष्ठ महविद्यालयातील कला शाखेचा निकाल 82.75 टक्के लागला. हातखंबा येथील देसाई हायस्कूल व भाईशेठ मापुसकर कनिष्ठ महाविद्यालयाचा निकाल 97.46 टक्के लागला. कला 94.11, वाणिज्य 100 टक्के लागला. वाटद-खंडाळा येथील पा. शं. बापट कनिष्ठ महाविद्यालयाचा निकाल 97.40 टक्के लागला. विज्ञान 100 टक्के व वाणिज्य 95.14 टक्के लागला. विजू नाटेकर कनिष्ठ महाविद्यालयाचा निकाल 93.89 टक्के लागला. विज्ञान 87.69, कला 89.88 व वाणिज्य 98.72 टक्के लागला.
"अभ्यंकर-कुलकर्णी' चा निकाल 91.53 टक्के
रत्नागिरी - येथील अभ्यंकर-कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालयाचा निकाल 91.53 टक्के लागला. विज्ञान शाखा 88.49 टक्के, कला 87.17, वाणिज्य 99.29 टक्के लागला. विज्ञान शाखेत अथर्व भिडे याने (96.46 टक्के) प्रथम क्रमांक मिळवला. मुक्ताई देसाई (94), मुग्धा तगारे (93.85) यांनी अनुक्रमे द्वितीय, तृतीय क्रमांक मिळवले. कला शाखेत स्वामीनी मालपेकर (90.31), सर्वेश कुलकर्णी (89.69) आणि सोनल धनावडे (89.08) यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक मिळवला. वाणिज्य शाखेत बुद्धिबळपटू हर्ष मंत्रवादी (97.69) याने प्रथम क्रमांक पटकावला. द्वितीय क्रमांक विभागून ऋतूजा शेंबेकर, आदिती नागवेकर, निला बालाजी (प्रत्येकी 95.85), तृतीय क्रमांक विभागून शांभवी चौधरी व गायत्री पावसकर (प्रत्येकी 95.54) यांनी मिळवला. एमसीव्हीसी विभागात अकौंटिंग विषयात सिद्धी जाधव 90.46 (टक्के), इलेक्ट्रॉनिक्स टेलिकम्युनिकेशनमध्ये गौरी भाटकर (83.84), एमएलटी विषयात अस्मिता मायंगडे (86.62), लॉजेस्टीकमध्ये चिन्मय शिंदे (84.92) याने प्रथम क्रमांक मिळवला. महाविद्यालयाच्या अव्वल गुणांच्या परंपरेला अनुसरून विद्यार्थ्यांनी उज्ज्वल कामगिरी केली आहे. यात विद्यार्थी, पालक, मार्गदर्शक शिक्षक, विभागप्रमुखांचे योगदान असल्याचे प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर यांनी सांगितले.
"गांगण-केळकर'चा निकाल 95.04 टक्के
रत्नागिरी - दि न्यू एज्युकेशन सोसायटीच्या वि. स. गांगण कला वाणिज्य व त्रि. प. केळकर विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयाचा निकाल 95.04 टक्के लागला. महाविद्यालयातून एकूण 242 विद्यार्थी परीक्षेला बसले. यापैकी 230 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. कला शाखेचा निकाल 93.64 टक्के, वाणिज्य शाखा 98.63 टक्के, विज्ञान शाखा 93.33 टक्के लागला. कला शाखेत मयुरेश जायदे (81.07 टक्के) प्रथम, विज्ञान शाखेत सोनाली गोगटे (82.46), वाणिज्य शाखेत सेजल राणे (78.15) पहिली आली. प्रतिवर्षाप्रमाणे कनिष्ठ महाविद्यालयाने मिळवलेल्या घवघवीत यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष ऍड. बाबासाहेब परुळेकर, कार्याध्यक्षा ऍड. सुमित्रा भावे व पदाधिकारी यांनी मुख्याध्यापक, सर्व शिक्षक वर्ग व विद्यार्थ्यांचे कौतुक केले. मुख्याध्यापिका शुभांगी वायकूळ यांनी या यशामागे विद्यार्थी व त्यांना घडविणारे सहकारी शिक्षक यांचा सिंहाचा वाटा असल्याचे नमूद केले.
ताज्या आणि अचूक बातम्या वाचण्यासाठी डाऊनलोड करा 'सकाळ' चे मोबाईल अॅप!
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.