कोकण

देवगडच्या घाडींचा नारायण राणेंच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश

सकाळ वृत्तसेवा

देवगड (सिंधुदुर्ग) : येथील देवगड (Devgad,jamsande) जामसंडे नगरपंचायतीचे अपक्ष म्हणून निवडून आलेले नगरसेवक नीरज घाडी (Niraj Ghadi) यांनी आज दिल्ली येथे भाजपचे केंद्रीयमंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी कणकवली विधानसभा मतदारसंघाचे आमदार नीतेश राणे उपस्थित होते. दरम्यान, आमदारांच्या कार्यपध्दतीवर प्रभावित होऊन तसेच भविष्यात त्यांच्याकडून विकासात्मक कामासाठी होणारी मदत लक्षात घेऊन आपण भाजपमध्ये प्रवेश केला असल्याचे घाडी यांनी सांगितले.

केंद्रीय मंत्रीपदी निवड झाल्याबद्दल घाडी यांच्यासह अन्य कार्यकर्त्यांनी दिल्ली येथे केंद्रीयमंत्री नारायण राणे यांची भेट घेऊन त्यांचे अभिनंदन केले.

केंद्रीय मंत्रीपदी निवड झाल्याबद्दल घाडी यांच्यासह अन्य कार्यकर्त्यांनी दिल्ली येथे केंद्रीयमंत्री नारायण राणे यांची भेट घेऊन त्यांचे अभिनंदन केले. यावेळी कणकवली विधानसभा मतदारसंघाचे आमदार नीतेश राणे उपस्थित होते. या भेटीदरम्यान चर्चा होऊन अपक्ष नगरसेवक नीरज घाडी यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. घाडी यांनी जामसंडे भागातील मतदारसंघातून अपक्ष म्हणून निवडणूक लढवून ते निवडून आले होते.

निवडून आल्यानंतर गेली काही वर्षे ते आमदार नीतेश राणे यांच्यासोबत काम करत होते. मात्र आता त्यांनी भाजपमध्ये अधिकृत प्रवेश केला आहे. हा पक्ष प्रवेश दिल्ली येथे झाला. यावेळी भाजपचे विजयदुर्ग विभागाचे मंडल अध्यक्ष डॉ. अमोल तेली, जिल्हा कार्यकारणी सदस्य संदीप साटम, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष उत्तम बिर्जे, उपसभापती रवींद्र तिर्लोटकर, संदीप तावडे, शैलेश लोके, आरिफ बगदादी, अंकुश ठुकरुल, संतोष वालावलकर आदी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT