"Nature" came, causing damage of Rs 22 crore  
कोकण

"निसर्ग' आले, शासकीय इमारतींचे 22 कोटींचे नुकसान करून गेले 

राजेश कळंबटे

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात झालेल्या "निसर्ग' चक्रीवादळामुळे दापोली व मंडणगड तालुक्‍यातील शासकीय इमारतींचे सर्वाधिक नुकसान झाले आहे. तब्बल 22 कोटींपेक्षा अधिक नुकसान झाले असून यामध्ये शाळा वर्गखोल्या, अंगणवाड्या, प्राथमिक आरोग्य केंद्रे व अन्य शासकीय कार्यालयांचा समावेश आहे. दुरुस्तीसाठी जिल्हा नियोजन समितीकडे निधीची मागणी करणार असल्याची माहिती जिल्हा परिषद बांधकाम व आरोग्य सभापती बाबू म्हाप यांनी दिली. 

बांधकाम समितीची आढावा बैठक शुक्रवारी (ता. 17) झाली. या वेळी अधिकारी उपस्थित होते. "निसर्ग' चक्रीवादळात जिल्हा परिषदेच्या अनेक इमारतींची छपरे उडाली आहे. शाळांची छप्पर दुरुस्ती तत्काळ करणे गरजेचे आहे. यंदा कोरोनामुळे शैक्षणिक सत्र सुरू झालेले नाही. येत्या दोन ते तीन महिन्यात शाळा सुरू होण्याची शक्‍यता आहे. त्यापुर्वी तत्काळ दुरुस्ती करणे आवश्‍यक आहे. त्यासाठी निधीची आवश्‍यकता आहे. शासनाकडून या दुरुस्तीसाठी विशेष निधी येत नाही, त्यामुळे नियोजनमधून मिळणाऱ्या निधीवरच ही कामे अवलंबून राहणार आहेत. त्यासाठी नियोजनकडे मागणी करण्यात आलेली आहे. 

पुढील महिन्यात गणेशोत्सव येत आहे. त्यामुळे गणेशोत्सवापूर्वी रस्त्याच्या दुतर्फा वाढलेली झाडेझुडपे काढून टाकण्यात यावीत, अशा सूचना प्रत्येक ग्रामपंचायतीला देण्यात आल्या आहेत. ज्या रस्त्यांवर खड्डे पडले आहेत, त्या ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपात उपाययोजना कराव्यात. जास्त दुरुस्तीची आवश्‍यकता आहे तेथे लागणारा निधी मिळवण्यासाठी पालकमंत्री अनिल परब व उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्याकडून मार्गदर्शन घेण्यात येईल. रत्नागिरी लवकरात लवकर खड्डेमुक्‍त कशी होईल याकडे लक्ष देण्याच्या सूचना म्हाप यांनी बैठकीत दिल्या. 

नागरिकांना आवाहन... 
कोरोनासारखी गंभीर समस्या आपल्या जिल्ह्यात असून जिल्हावासीयांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी. कामाशिवाय घराबाहेर पडू नका, असे आवाहन आरोग्य सभापती म्हाप यांनी केले. 

संपादन : प्रफुल्ल सुतार 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Abhijeet Dipke MPSC : धर्म-जातीच्या नावावर मत मागता, पण शिक्षणाचं काय?’; पुण्यातील एमपीएससी आंदोलनात अभिजीत दिपकेंचा सवाल

GST Council : GSTचे नियम बदलणार? 9 गुन्हे वगळण्याचा प्रस्ताव, अटक प्रक्रियेतही मोठी सुधारणा होण्याची शक्यता

IND vs WI, Schedule: वनडे मालिका संपली, आता ५ सामन्यांची T20I मालिका होणार सुरू; संपूर्ण वेळापत्रक जाणून घ्या

Latest Marathi News Live Update : देश-विदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

किटलीशिवाय कप-बशी भरणार नाही; शिट्टीपासून सावध राहा; सोमेश्वर निवडणुकीत युगेंद्र पवारांचे सूचक आवाहन

SCROLL FOR NEXT