nisarga cyclone effect on ratnagiri district 
कोकण

ब्रेकिंग - चक्रीवादळाचा रत्नागिरीला तडाखा; जिल्ह्यात मोठे नुकसान 

सकाळ वृत्तसेवा

रत्नागिरी - जिल्ह्याला मुसळधार पावसाने झोडपून काढले असून चक्रीवादळाचा तडाखा बसण्यास सुरुवात झाली आहे. किल्ला परिसरात वृक्ष कोसळून पडल्याने घराचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच किनारपट्टी भागातील नारळ आणि सुरुची झाडे मोडून पडली आहेत. राजिवडा, मांडवी किनाऱ्यावरही झाडांची पडझड झाली आहे. संगमेश्वर तालुक्यात देवरुख येथे घरांचे मोठे नुकसान झाले आहे. तर भरकटलेलं जहाज रत्नागिरीच्या मिऱ्या समुद्रातील अजस्त्र लाटांमध्ये अडकले आहे. 

जहाजाला मिरकरवाडा बंदरात नेण्यात अपयश आले आहे. जहाजावर काही खलासी असण्याची भीती वर्तविण्यात आली आहे.

कोकणच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

 रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडतोय.  खारेघाट रोड येथील काशी विषश्वेवर मंदिराच्या बाजूला वादळामुळे झाड मध्येच तुटले. गुहागर, दापोली, मंडणगड आणि रत्नागिरीत हा मुसळधार पाऊस कोसळतोय. हा निसर्ग चक्रीवादळाचा परिमाण असून वाऱ्याचा वेगही वाढलाय. ताशी ८० ते १०० किलोमीटर वेगाने वारे वाहत आहेत. संगमेश्वरमधील देवरुखमध्ये देखील पाऊस आणि वाऱ्यानं जोर धरला आहे. देवरुखमधील भंडारवाडीत झाड कोसळून घराचं नुकसान झाले आहे. 

निसर्ग चक्रीवादळाचा परिणाम किनारपट्टीपासून ५० किमी दूर असलेल्या देवरुखातही जाणवत आहे. काल मध्यरात्रीपासून परिसरात रिमझिम पाऊस सुरु होता. तर सकाळी ६ वाजल्यापासून पावसानं जोर धरला असून आता पावसासोबत वाराही वेगानं वाहतोय. शहरातील भंडारवाडी इथं वाऱ्यानं एक वृक्ष मुळासकट उन्मळून पडलाय. त्यामुळे घरांचं आणि शौचालयांचंही नुकसान झाले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BMC मुख्यालयात रात्रीस खेळ चाले! निवडणूक जाहीर होताच प्रशासनाचा रात्रभर 'कारभार', आचारसंहिता भंग?

विदर्भाचे दोन्ही पोट्टे IPL मध्ये चमकणार! SRH-Mumbai Indians कडून उतरणार मैदानात, विदर्भाच्या क्रिकेटचा नवा अध्याय!

Latest Marathi News Live Update : कोल्हापूर खंडपीठाच्या स्थापनेला आव्हान देणारी याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली

Bank Holiday : आजपासून 5 दिवस देशभरातील बँका बंद! राज्यातील बँकाही 4 दिवस बंद; कधी ते जाणून घ्या?

Pradnya Satav : प्रज्ञा सातव यांचा आमदारकीचा राजीनामा, भाजपमध्ये आज प्रवेश; नाना पटोले म्हणाले- सत्तेतील पैशांतून खरेदी सुरुय

SCROLL FOR NEXT