Nitesh Rane case esakal
कोकण

नितेश राणेंचा आज फैसला! प्रकृतीच्या कारणास्तव सध्या रुग्णालयात

सकाळ डिजिटल टीम

भाजपचे आमदार नितेश राणे यांना संतोष परब हल्ल्याप्रकरणी जिल्हा सत्र न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. यानंतर त्यांना न्यायालयीन कोठडी दिली. मात्र, प्रकृती अस्वस्थ झाल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. आज राणेंना पुन्हा कोर्टात हजर करण्यात येणार आहे. दोन दिवसांच्या पोलीस कोठडीनंतर त्यांना जामीन मंजूर होणार की नाही, याकडे लक्ष्य लागलं आहे. (Nitesh Rane arrest) दरम्यान, मंत्री नारायण राणे दिल्लीतील संसदीय अधिवेशनातून थेट सिंधुदूर्गमध्ये दाखल झाले आहेत.

तीन दिवसांपूर्वी नितेश राणे कणकवली न्यायालयात शरण आले होते. यानंतर त्यांनी न्यायालयीन कोठडीसाठी मागणी केली. मात्र, संतोष परब हल्ल्यात चौकशी सुरू असल्याने पोलिसांनी न्यायालयाकडे वेळ मागितला. यानंतर न्यायालयाने राणेंना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.

राणेंचा काल कोठडीत पुस्तक वाचत असताना फोटोही व्हायरल झाला होता. त्यावर नेटकऱ्यांनी प्रतिक्रियाही दिल्या आहेत.

काय आहे प्रकरण?

१८ डिसेंबर २०२१ रोजी कणकवली शहरातील नरडवे तिठा येथे जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांचे प्रचारप्रमुख असलेल्या संतोष परब यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला होता. या हल्ल्यातील संशयित आरोपी अटक केल्यानंतर तपासाची सुई आमदार नितेश राणे यांच्याकडे गेली होती. त्यामुळं कणकवली पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या प्रकरणी आपल्याला अटक होऊ नये यासाठी नितेश राणे आणि संदेश सावंत यांच्यावतीनं जिल्हा न्यायालयात २७ डिसेंबर रोजी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज करण्यात आला होता. या अर्जावर २८ व २९ रोजी सुनावणी झाल त्यानंतर कोर्टानं निकाल राखून ठेवण्यात आला होता. गुरुवारी सायंकाळी ६ वाजता याबाबतचा निकाल न्या. एस. व्ही. हांडे यांनी दिला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Marathi News : युवराज सिंग SRH मालकीण काव्या मारनवर नाराज; म्हणाला, अभिषेक शर्माने फ्रँचायझीसाठी ७ वर्ष घासली...

Latest Marathi News Live Update : पुणे शहरातील अनेक प्रमुख रस्ते पाण्याखाली

IPL 2026 : RCB च्या गोलंदाजाने क्रिकेट बोर्डाला न्यायालयात खेचले, ९ एप्रिलला निकाल; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

Rawdogging Boredom: 'काहीही न करता बसणं' बनलं ट्रेंड! Gen Z चा "Rawdogging Boredom" फंडा आहे तरी काय?

IPL 2026: 'तो' ड्रेसिंग रूममधून पळत आला, डेव्हिड मिलरला फलंदाजीला जाण्यास रोखले अन्... DC च्या डग आऊटमधील Video Viral

SCROLL FOR NEXT