कोकण

गोव्याची एकही गाडी सिंधुदुर्गात येवू देणार नाही - नितेश राणे

सकाळवृत्तसेवा

कणकवली - जिल्ह्यातील मच्छिमार बांधवाना वेटीस धरण्याचे काम गोवा राज्य सरकारकडून सातत्याने होत आहे. गोवाची ही अरेरावी अशी चालू राहील्यास गोवा पासिंगची एकही गाडी जिल्ह्यातून जावू देणार नाही, असा इशारा आमदार नितेश राणे यांनी येथे पत्रकार परिषदेतून दिला आहे.

जिल्ह्यातील मासे वाहतूक करणार्‍या वाहतूकदारांच्या प्रश्‍नावर आमदार राणे यांनी आपली भूमीका जाहीर केली. ते म्हणाले. जिल्हाच्या किनारपट्टीवर कुठल्या ना कुठल्या मार्गाने संकट येत आहे. मच्छिमार बांधवांना गेल्या साडेचार वर्षांपासून
मी वेगळ्या माध्यमातून पाठीशी राहिलेला आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्याचे अर्थकारण हे मासेमारीवर आहे. त्यामुळे गोवा सरकार कडून राजकारण केले जात आहे. आम्ही त्यांच्यावर अवंलबून असल्याने अर्थकारण करू शकत नाही असे त्यांना वारंवार वाटते. त्यामुळे हा प्रश्न निर्माण झालेले आहे.

- नितेश राणे

मासेविक्रेत्यांना गोवा सरकारकडून वेठीस धरले जात आहे. तरीही ना सरकारी जाग आलेली आहे किंवा पालकमंत्री असताना त्यांनाही याची जाणीव राहीलेली नाही अशी टीकाही राणे यांनी केली. 

राणे म्हणाले, “आरोग्याच्या बाबतीतही उपचार घेण्यासाठी जे रूग्ण गोवा बांबूळी येथे जातात. त्यांना पाठीमागे उभे राहावे लागते. असा अन्याय सुरू आहे. आता मच्छीमारांवर निर्बंध आणून पुन्हा त्रास दिला जात आहे. त्यामुळे आम्हाला आता आरपारची लढाई करावी लागेल, तशी आमची तयारी आहे. मासेमारी विक्रीचा हा प्रश्न सोडवला नाही तर गोव्याच्या गाड्या परत तिकडे जाणार नाहीत असा इशारा श्री. राणे यांनी दिला असून ज्यांना समजायचे ते समजतील असे सुचक व्यकत्वही त्यांनी केले आहे.

बांदा येथे खाजगी तत्वावर मासे मार्केट उभारणार - नितेश राणे
मासेविक्रेत्या सोय व्हावी म्हणून खासगीतत्वावर बांदा येथे मासे मार्केट उभारणार आहोत. त्यासाठी जागा उपलब्ध करण्यासाठी आम्ही प्रयत्न सुरू केले आहेत. खासगी तत्त्वावर मासे मार्केट उभारण्याची तयारी झाली आहे. आमच्या माध्यमातून सत्ताधारी राज्यकर्त्यांसोबत  बैठका घेऊन कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी पाऊल पुढे टाकत आहोत, असे आमदार राणे यांनी जाहीर केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SEBI म्युच्युअल फंड आणि डीमॅट नॉमिनेशनचे नियम बदलणार! सप्टेंबरपूर्वी पूर्ण करा 'हे' महत्त्वाचे काम

IPL 2026 Final, RCB vs GT live: वादग्रस्त निर्णयाने जीवदान मिळालेला वॉशिंग्टन नडला; गुजरातला सावरले, बंगळुरूसमोर ठिकठाक लक्ष्य

IPL 2026 Final, RCB vs GT live: वॉशिंग्टन सुंदरची एकाकी झुंज, नाबाद अर्धशतक झळकावून वाढवली गतविजेत्यांची डोकेदुखी

नेपाळनेही भारतीय जमीन बळकावली, पंतप्रधान बालेन शाह यांचे मोठे विधान, लिपुलेख-कालापानी वाद पुन्हा चर्चेत!

IPL 2026 Final, RCB vs GT live: वादग्रस्त निर्णय? पाटीदार अम्पायरकडे धावला, विराट संतापला... वॉशिंग्टनला परत बोलवल्याने राडा

SCROLL FOR NEXT