nitesh rane press conference on new agricultural bill 
कोकण

"ये अंदर की बात है, शरद पवार हमारे साथ है"! ; नितेश राणे

भुषण आरोसकर

सावंतवाडी :  नवीन कृषी विधेयक केंद्र सरकारने जाहीर केल्यामुळे शेतकऱ्याला आपला माल बाजार समितीत न ठेवता कुठेही विकण्याचे स्वतंत्र मिळणार आहे. या विधेयकाविरोधात विरोधक जाणून बुजून गैरसमज पसरवत सर्वत्र विरोध करत आहेत. केंद्र सरकारने जाहीर केलेले विधेयक शेतकऱ्यांना ताकद देण्यासाठी करण्यात आले असून कॉंग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी दिखाव्यासाठी विरोध करून आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी सभा त्याग केला असला तरी "ये अंदर की बात है शरद पवार हमारे साथ है" अशी मिश्किल टिपण्णी आज येथील पत्रकार परिषदेत आमदार नितेश राणे यांनी दिली.


या विधेयकामुळे सर्वच शेतकऱ्यांचा फायदा होणार असल्याने केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे जाहीर आभार मानत राणे म्हणाले, सिंधुदुर्गच्या जिल्हा आरोग्य यंत्रणेचा पुरता बोजवारा उडालेला आहे. सत्ताधाऱ्यांचा यावर कोणत्याही प्रकारचा अंकुश नाही. जिल्हा रुग्णालय यंत्रणा सक्षम नसल्याचे दिसून येत आहे. कोरोना रुग्णांचे प्रमाण घटविण्यासाठी जिल्ह्यात प्लाझमा थेरेपी होणे गरजेचे आहे. जिल्हा रुग्णालयासाठी आलेले 23 कोटीतील थोडीशी रक्कम वापरण्यात आली आहे. मुख्यमंत्री हे व्हीसी फक्त दाखवायला घेतात. बाकी त्यांचे कार्य शून्य. नारायण राणेंसारखे अनुभवी तत्कालीन पालकमंत्री जिल्ह्याला लाभले होते. आताच्या पालकमंत्र्यांनी त्यांच्या अनुभवाचा वापर करायला हवा होता. राणेंचा अनुभव यंत्रणा हाताळण्यासाठी उपयोगी पडला असता, मात्र तसे झाले नाही. जिल्हा रुग्णालयात वेंटीलेटर नाही, ऑक्सीजन सिलेंडर नाही. अशी गत आहे. सत्तारूढ पार्टी सुशेगाद आहे. 

यावेळी जिल्हाध्यक्ष राजन तेली, नगराध्यक्ष संजू परब, नगरसेवक उदय नाईक, नगरसेवक सुधीर आडीवरेकर, नगरसेवीका दिपाली भालेकर, नगरसेवक आनंद नेवगी, शहर उपाध्यक्ष अजय गोंदावळे, बंटी पुरोहित आदी उपस्थित होते.

संपादन - धनाजी सुर्वे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Commonwealth Games 2026: इलेक्ट्रिशियनच्या लेकीने भारतासाठी जिंकलं पदक! ज्ञानेश्वरी यादवने गरिबीचा 'भार' झुगारून घडवला इतिहास, तिरंग्यासमोर नतमस्तक

Pune Police: पुण्यात पोलिसांनीच टाकला दरोडा? एक कोटींची कॅश लुबाडण्यासाठी नवले पुलावर केलं कांड; 'असा' झाला भांडाफोड

Latest Marathi News Live Update: बंडखोर खासदारांवरील अपात्रतेच्या याचिकांचा त्वरित निपटारा करण्याची विनंती केली

‘धुरंदर’नंतर ‘एलिना’ची ताडोबातून ज्ञानगंगा अभयारण्यात एन्ट्री, व्याघ्र संवर्धनाला मिळणार आणखी बळ

Ambulance Fare: आता रुग्णवाहिकांमध्ये शासकीय भाडे, रुग्णांची लूट करणाऱ्यांना चाप; कसे असतील नवे दर?

SCROLL FOR NEXT