Nitesh Rane 
कोकण

नितेश राणे आहेत कुठे? सिंधुदुर्ग, रायगड पोलिस गोव्यात दाखल

सकाळ डिजिटल टीम

आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांच्यावर अटकेची टांगती तलवार असल्यानं सिंधुदुर्गमधील वातावरण तापलं आहे.

सिंधुदुर्ग - आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांच्यावर अटकेची टांगती तलवार असून ते अज्ञातवासात गेले आहेत. संतोष परब (Santosh Parab) हल्ला प्रकरणात कणकवली पोलिस कारवाईची तयारी करत आहेत. दरम्यान, त्याआधी नितेश राणे यांनी अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात धाव घेतली होती. मंगळवारी दुपारी यावर सुनावणी होण्याची शक्यता आहे. त्याआधी नारायण राणे (Narayan Rane) यांच्या बंगल्याबाहेर मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. नितेश राणे यांच्यासमोर कोणते कायदेशीर पर्याय आहेत याचीही चाचपणी केली जात असल्याचं सांगितलं जात आहे.

आतापर्यंत संतोष परब हल्ला प्रकरणी पाच जणांना अटक कऱण्यात आली आहे. यात एकाला दिल्लीतून अटक केली असून सर्वांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. आता आमदार नितेश राणे यांच्यावर अटकेची टांगती तलवार असल्यानं सिंधुदुर्गमधील वातावरण तापलं आहे.

अधिवेशनात व्हिप बजावल्यानंतरही नितेश राणे अधिवेशनात उपस्थित राहिले नव्हते. त्यामुळे ते कुठे आहेत असा प्रश्न निर्माण होत आहे. नितेश राणे दिल्लीला जाण्याची शक्यताही वर्तवली जात आहे. त्यांचा फोनसुद्धा स्विच ऑफ असल्याचं समजते. आमदार नितेश राणे गोव्यात असल्याची चर्चा आहे. तर सिंधुदुर्ग आणि रायगड पोलिसांचे पथक गोव्यात दाखल झालं आहे. त्यांचा शोध घेतला जात आहे. नितेश राणेंची अटक टाळण्यासाठी नारायण राणे यांच्याकडून प्रयत्न सुरु आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: आई-वडिलांवरच अत्याचार! एकुलत्या एक मुलाविरोधात ५८ वर्षीय मातेचा लढा; न्यायालयाचे कडक आदेश..

IND vs ENG: वैभव सूर्यवंशीला संधी नाहीच, स्टार खेळाडूचे कमबॅक; पहिल्या T20I साठी कशी आहे Playing XI?

WhatsApp चं Username फीचर वादाच्या भोवऱ्यात, केंद्र सरकारने थेट Meta ला पाठवली नोटीस, तीन दिवसांत उत्तर देण्याचे निर्देश

Raigad Accident: पालीत मोठा अनर्थ टळला! खड्ड्यांमुळे एसटी बस रस्त्याखाली घसरली; चालकाच्या प्रसंगावधानाने ४२ प्रवाशांचे प्राण वाचले

Satara Heritage: साताऱ्याच्या ऐतिहासिक वैभवाला नवी झळाळी! संगम माहुली विकासासाठी १३२.९५ कोटींना मंजुरी, काय आहे ऐतिहासिक महत्त्व..

SCROLL FOR NEXT