Nitin Bangude-Patil Esakal
कोकण

ओमिक्रॉनला परतवण्यासाठी शिवरायांची रणनिती वापरा ; बानुगडे-पाटील

प्रा. बानुगडे-पाटील; बाबासाहेबांची व्याख्याने इतिहासाबद्दल नवी दृष्टी देणारी

सकाळ वृत्तसेवा

रत्नागिरी: इतिहास हा अनेकांच्या कौतुकाचा, स्वाभिमानाचा, प्रेरणेचा, अनेकांना प्रोत्साहन देणारा आहे. हा इतिहास जर वर्तमानात पाठिशी घेतला तर भविष्यकाळात सुधारणा करता येतील, ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे. साडेतीनशे वर्षांपूर्वी महाराष्ट्राच्या मातीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी इतिहास घडविला. स्वराज्य निर्माण करण्याची अचाट शक्ती, रयतेविषयी निस्सिम प्रेम आणि रयत हेच स्वराज्य मानणारे शिवाजी महाराज कधी गाफिल राहिले नाहीत. ते लढत आणि गनिमीकावा करतच राहिले. त्यामुळे कोरोना महामारीबाबत आपणही गाफिल न राहता, त्याच्याविरुद्ध लढत राहिले पाहिजे, सावध राहिले पाहिजे, असा सल्ला प्रा. नितीन बानुगडे-पाटील (Nitin Bangude-Patil)यांनी दिला.

पद्मविभूषण, महाराष्ट्र भूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आयोजित सभेवेळी शिवचरित्र या विषयावर ते बोलत होते. शिवचरित्रावर बोलताना अनेकांच्या अंगावर शहारे येतील, प्रेरणा मिळेल, असा अख्खा इतिहास सर्वांपुढे मांडला. स्वतःच्या सुरक्षिततेपेक्षा रयतेची सुरक्षा महत्त्वाची, हा संदेश देत ते पुढे चालत राहिले. स्वराज्य आले तर रयत सुरक्षित हे शिवरायांनी जाणले होते.

शिवाजी महाराजांनी सिद्धी जोहरवर विजय मिळविल्यानंतर ते शांत बसले नाहीत. त्यांनी सहा महिने नियोजन केले. काही लढाया चार भिंतीच्या आत राहुनही लढायच्या असतात, हे तेव्हा शिवाजी महाराजांनी दाखून दिले. त्यांनी तयार केलेले सैन्य राजासाठी नाही तर राज्यासाठी होते, ही त्यांची क्रांती होती. कोणत्याही कठीण प्रसंगातून मार्ग काढणे हिच शिकवण शिवाजी महाराजांनी दिली.

ओमिक्रॉनचा मुकाबला करून परतवा

ते पुढे म्हणाले, ज्यांच्यामध्ये संयम असतो, त्याच्या वाट्याला कधीच पराभव येत नाही. कोरोना महामारीबाबतही तेच सांगायचे आहे. पहिली लाट आली दुसरी आली, आता तिसरी थोपविण्यासाठी यंत्रणा सज्ज आहे. शत्रु नेहमी आपल्या दरवाजावर दस्तक देतो. तसा ओमिक्रॉन विषाणू आपल्या दरवाजावर दस्तक देत आहे. आपण गाफिल राहून चालणार नाही. त्याच्या मुकाबला करून त्याला परतून लावायलाच हवे.

पुरंदरे यांच्या व्याख्यानाने प्रेरित झालो

प्रा. बानुगडे-पाटील म्हणाले, मी चौथीत असताना बाबासाहेब पुरंदरे यांचे व्याख्यान ऐकले आणि प्रेरित झालो. माझ्या आजोळी आजी इतिहासाबद्धल मला सांगायची. तिच्या भाषेत सांगायला सुरवात केली आणि इतिहासाच्या प्रवाहात वाहवत गेलो. बाबासाहेबांची भाषणं शोधायला हवी, ती लोकांपर्यंत पोचवायला हवी. बाबासाहेब पुरंदरे यांचे व्याख्यान फक्त प्रथा, प्रवाहबद्दलच नाही तर इतिहासाबद्दल नवी दृष्टी देणारी आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Schools Closed : 'पुणे ग्रँड चॅलेंज टूर स्टेज -4' ; २३ जानेवारीला महापालिका हद्दीतील सर्व शाळा दुपारी १२ वाजेनंतर बंद

Viral Video: अंगावर काटा आणणारा क्षण! ढाब्यासमोर ट्रकचा टायर फुटून थेट लोकांच्या दिशेने घुसला, व्हिडिओ व्हायरल

Latest Marathi News Live Update : उबाठाची नवनिर्वाचित नगरसेविका शिंदेसेनेच्या संपर्कात ? अनुपस्थितीमुळे खळबळ

BMC राजकारणात मोठा ट्विस्ट! उद्धव ठाकरेंसाठी चिंतेची बातमी, एक नगरसेवक फुटला, कुणाकडे गेला?

झाकीर खानने जाहीर केला ब्रेक घेण्याचा निर्णय; युट्युब अन् स्टॅण्डअपमधून किती कमाई करतो कॉमेडियन?

SCROLL FOR NEXT