cm,Gadkari 
कोकण

मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्राचा गडकरींनी खुलासा करावा ; शिवसेनेची मागणी

मुझफ्फर खान -सकाळ वृत्तसेवा

शिवसैनिकांची तक्रार असेल तर गडकरींंनी मार्ग काढायचा की, शिवसेनेला मिळेल तिथे ठोकायचे .

चिपळूण (रत्नागिरी) : केंद्रीय मंत्री नितिन गडकरी (Nitin Gadkari) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना लिहिलेले पत्र प्रसिद्धी माध्यमात पर्यंत कसे आले ? असा प्रश्‍न शिवसेना नेते आणि गुहागरचे आमदार भास्कर जाधव यांनी आज पत्रकार परिषदेत उपस्थित केला. शिवसैनिकांची तक्रार असेल तर गडकरींंनी मार्ग काढायचा की शिवसेनेला मिळेल तिथे ठोकायचे याचा खुलासा भाजपकडून आणि नितीन गडकरी यांच्याकडून व्हायला पाहिजे अशी आग्रही मागणीही त्यांनी केली.

केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांनी पत्र लिहून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांची तक्रार केली होती. या संदर्भातील पत्र प्रसिद्धी माध्यमांनी पर्यंत पोहोचल्यानंतर आमदार भास्कर जाधव यांनी भाजपवर निशाणा साधला.

जाधव म्हणाले, मुख्यमंत्री ठाकरे आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे अतिशय जवळचे संबंध आहेत. एकमेकांबद्दल आदराची भावना आहे. गडकरी यांनी उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिण्याचा अधिकार आहे. पण शिवसैनिकांची तक्रार करायची होती तर गडकरी यांनी ठाकरे यांना फोन करून ही याबाबतची माहिती दिली असती.

पण गडकरी यांनी पत्र का लिहले आणि तेथे प्रसिद्धी माध्यमांसमोर का आले ? तुम्हाला कोणाची तक्रार असेल तर त्यातून मार्ग काढायचा आहे की, शिवसेनेला संधी मिळेल त्या ठिकाणी ठोकायचे आहे. असा प्रश्नही त्यांनी केला. सिंधुदुर्ग मधील भाजपचे आमदार नितेश राणे यांनी राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांवर चिखलफेक केली होती. याची आठवण ही आमदार जाधव यांनी करून दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MahaRERA Ruling: महारेरा : विकसकाला घरखरेदीदाराची परवानगीशिवाय फ्लॅट बुकिंग रद्द करण्यास मज्जाव; उशिरा ताबा दिल्यास व्याज देण्याचा आदेश

Pune domestic violence FIR: मानपान व मोटार न दिल्याच्या कारणावरून विवाहितेचा छळ; पतीसह चौघांविरुद्ध नऱ्हे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

Marathi Literature Centenary Funding: शंभराव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी १७ कोटी ५० लाखांचा निधी; उदय सामंत यांची मोठी घोषणा

Pune Civic Recruitment : पुणे महापालिकेतील १६९ कनिष्ठ अभियंता भरतीवर तक्रारींचे ग्रहण; परीक्षा, निकाल, पडताळणी पूर्ण तरी नियुक्ती आदेश रखडले

Medical Emergency: एक किलोपेक्षा अधिक मॅग्नेट गिळलेल्या १० वर्षीय मुलाचा जीव वाचला; विरार-मिरा रोड येथील डॉक्टरांची यशस्वी शस्त्रक्रिया

SCROLL FOR NEXT