Notice to four corporators in sawantwadi  
कोकण

व्हिप बजावुनही सभेला गैरहजर, चौघा नगरसेवकांना नोटिस 

भूषण आरोसकर

सावंतवाडी (सिंधुदुर्ग) - येथील पालिकेच्या मासिक बैठकीला व्हिप बजावुनही गैरहजर राहिलेल्यांमधून चौघांना शिवसेनेकडून आज कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली. त्यात शिवसेनेचे दोन तर एक अपक्ष व एक भाजप नगरसेवकांचा समावेश आहे. तशी माहिती ज्येष्ठ नगरसेविका तथा गटनेत्या अनारोजीन लोबो यांनी दिली. पक्षाच्या विरोधात जाणाऱ्यांविरोधात शिवसेना भवनातूनच आदेश आल्यानंतर याबाबतचे आक्रमक पाऊल उचलल्याचे लोबो यांनी स्पष्ट केले. 

येथील पालिकेची सभा 10 सप्टेंबरला झाली. या सभेत सत्ताधारी भाजपने बीओटी तत्वावर मॉल उभारण्याचा विषय ठेवला होता. पालिकेचे नुकसान करणारा आणि जनहितविरोधी निर्णय असल्याने या विषयाच्या ठरावाला विरोध करण्यासाठी गटातील सात नगरसेवकांना सभागृहात उपस्थित राहून विरोध करण्यासंदर्भातील व्हीप गटनेत्या या नात्याने लोबो यांनी बजावला होता. 

गटातील उपनगराध्यक्षा अन्नपूर्णा कोरगावकर, सुरेंद्र बांदेकर, शुभांगी सुकी, माधुरी वाडकर, दीपाली सावंत, आनंद नेवगी, बाबू कुडतरकर यांना व्हीप बजावण्यात आला होता. यावेळी नेवगी यांनी स्वतः व्हिप न स्विकारल्याने त्याच्या घराच्या दरवाज्यावर व्हिप बजावण्यात आला होता. यापैकी सुकी, सावंत, उपनगराध्यक्षा कोरगावकर व भाजपाचे नगरसेवक नेवगी हे सभेला उपस्थित नव्हते.

घरात कोरोना रूग्ण असल्याने बांदेकर, माधुरी वाडकर ऑनलाईन सभेसाठी तयार होते; परंतु ऑफलाईन सभा झाल्याने ते येऊ शकले नाहीत. त्यामुळे त्यांना नोटीस बजावली नाही. सुकी तसेच सावंत यांनी लोबो यांच्याकडे आजारी असल्याबाबत अर्ज दिला होता, असे असताना त्यांनाही नोटीस बजावण्यात आली आहे. कोरगावकर, नेवगी हे भाजपवासी झाले आहेत; मात्र गट स्थापन करताना गटाबरोबर असल्याने या दोन नगरसेवकांना व्हीप लागू होतो. तरीही या दोन नगरसेवकांनी व्हीपचे उल्लघंन केल्याने त्यांच्या अडचणी वाढण्याची दाट शक्‍यता निर्माण झाली आहे. 

लोबो यांना विचारले असता त्या म्हणाल्या, ""आम्ही अनुपस्थित सर्व नगरसेवकांना कारणे दाखवा नोटीस बजावणार आहोत, हे त्याचवेळीच स्पष्ट केले होते. नोटिस दिलेल्या चौघांमधील सेनेच्या सावंत व सुकी यांनी आजारी होतो असे सांगितले होते तर याबाबत सुकी यांनी तसे पत्रही दिले होते; मात्र नोटिशीला तसे उत्तर त्यांनी देणे आवश्‍यक आहे. 

संपादन - राहुल पाटील

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather: पावसाने राज्याची चिंता वाढवली; पण पुढील वर्षासाठी गुड न्यूज! एल निनोबाबत ‘नोआ’नेमका काय वर्तवला अंदाज?

Pilbhit Tiger Reserve: व्याघ्र प्रकल्पात विकेंड सफारी महागली; शनिवार-रविवारचे तिकीट २०० रुपयांवर, काय आहे कारण ?

Team India Live Streaming: सुपर संडे! भारताचे दोन मोठे सामने, Asia Cup Final अन् अफगाणिस्तानविरुद्ध रंगणार टी२०; कुठे पाहाणार?

Ukadiche Modak Recipe: केशराचा सुगंध, नारळ-गुळाची गोडी आणि 'हा' एक पदार्थ… बाप्पासाठी असे बनवा स्पेशल उकडीचे मोदक!

IND vs AFG: वैभव सूर्यवंशी की संजू सॅमसन, कोणाला मिळणार संधी? कर्णधार श्रेयस अय्यरने दिले उत्तर; ईशान किशनच्या दुखापतीवरही अपडेट

SCROLL FOR NEXT