

El Nino Impact In Maharashtra To End Before 2027 Monsoon NOAA Predicts Neutral Pacific Conditions And Relief For Farmers
sakal
पुणे : अमेरिकी हवामानशास्त्र संस्था ‘नोआ’च्या क्लायमेट प्रेडिक्शन सेंटरने (सीपीसी) नुकत्याच वर्तविलेल्या अंदाजानुसार, मे २०२७ मध्ये प्रशांत महासागरात न्यूट्रल स्थिती निर्माण होऊ शकते. पुढील वर्षी मार्चपासून विषुववृत्तीय प्रशांत महासागराचे तापमान घटण्यास सुरुवात होऊन मेपर्यंत तापमान सरासरीपेक्षा ०.५ अंशांच्या दरम्यान येण्याची शक्यता वाढली आहे.