Now there will be new rules for quarantine 
कोकण

आता क्वारंटाईनसाठी असणार नवे नियम

राजेश कळंबटे

रत्नागिरी - क्वारंटाईनचे नवे नियम बाधित किंवा संशयितांना दिलासा देणारे आहेत. नव्या निकषाप्रमाणे बाधितांचा डिस्चार्ज कालावधी 10 दिवस करण्यात आला आहे. त्यामध्ये शेवटेच 3 दिवस देखरेखीखाली ठेवून काहीच लक्षणे आढळली नाहीत तर स्वॅब न घेता क्वारंटाइन सेंटरमधून सोडण्यात येणार आहे. मात्र त्याने 7 दिवस होम क्वारंटाईन व्हायचे आहे. तो कोरोनावाहक असू शकतो, परंतु दुसर्‍याला संसर्ग देण्याची क्षमता किंवा दाहकता त्या विषाणूमध्ये नसल्याने संसर्ग रोखता येतो, असा दावा आरोग्य विभागाने केला आहे.

क्वारंटाईनच्या नव्या नियमांनी नागरिकांमध्ये संभ्रम आणि अनेक प्रश्‍न निर्माण झाले आहेत. येथील क्वारंटाईन सेंटरमधून काही बाधितांना क्वारंटाईनचा कालावधी संपल्यानंतर स्वॅब न घेता घरी होम क्वारंटाईनसाठी पाठविल्याचा प्रकार पुढे आला आहे. याबाबत चौकशी केल्यानंतर या नव्या नियमांचा उलगडा झाला आहे. पूर्वी कोरोनाबाधिताचा 14 दिवसांचा क्वारंटाईनचा कालावधी होता. त्यानंतर त्याचा स्वॅब घेऊन तो निगेटिव्ह आल्यास त्याला पुन्हा 14 दिवस होम क्वारंटाईन केले जात होते. या सर्व प्रक्रियेमध्ये दुसर्‍या जिल्ह्यात जाणार्‍याला किंवा घरी जाणार्‍यांचा महिन्याचा कालावधी जात होता. मात्र शासनाने या निकषांमध्ये आता बदल केला आहे. त्यामुळे आता 14 दिवसांचा कोव्हिड रुग्णालयात किंवा 14 दिवसाच्या होम क्वारंटाईनची गरज नाही. बाधित रुग्ण आढळल्यास त्याच्यावर कोव्हिड रुग्णालयात 10 दिवस उपचार होणार. शेवटचे तीन दिवस देखरेखीखाली ठेवून त्यानंतर त्याला कोव्हिड सेंटरमध्ये तीन दिवस ठेवून काहीच लक्षणे न आढळल्यास स्वॅब न घेता त्यांना घरी सोडण्यात येणार आहे. त्यानंतर पाच ते सात दिवस होम क्वारंटाईन ठेवण्यात येणार आहे. नव्या नियमांनी लोकांमध्ये संभ्रम असला तरी आरोग्य विभागाने ते सुरक्षित असल्याचा दावा, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संघमित्रा फुले यांनी केला. 

 शासनाच्या नव्या निकषानुसार दहा दिवसानंतर काहीच लक्षणे आढळली नाहीत तर कोव्हिड सेंटरमधून स्वॅब न घेता घरी सोडण्यात येणार आहे. मात्र त्यानंतर 7 दिवस होम क्वारंटाईन व्हायचे आहे. तो कोरोना वाहक असू शकतो, परंतु उपचारानंतर दुसर्‍याला संसर्ग देण्याची क्षमता किंवा दाहकता त्या विषाणूमध्ये नसल्याने संसर्ग होत नाही अशी माहिती अतिरिक्त शल्य चिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.

संपादन - धनाजी सुर्वे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND VS AFG 3RD T20I: अभिषेक शर्माने इतिहास रचला; ट्वेंटी-२०तील सर्वात वेगवान शतक!मोडला रोहित शर्माचा विक्रम, विराटशी बरोबरी

Pune Ganeshotsav Traffic : पुण्यात गणेशोत्सवानिमित्त वाहतुकीत मोठा बदल; 18 ते 25 सप्टेंबरदरम्यान 'हे' प्रमुख रस्ते राहणार बंद, जाणून घ्या महत्त्वाचे पर्यायी मार्ग

Gangapur Sugar Mill: गंगापूर सहकारी साखर कारखाना कर्जमुक्त करण्याचा निर्धार; जय हिंदने गाळप केलेल्या ऊसाचे बिल १५ दिवसांत देण्याचे आश्वासन

Social Media Ban : मुलांचं मानसिक आरोग्य धोक्यात? 13 वर्षांखालील मुलांना सोशल मीडियावर बंदी; किशोरवयीनांसाठीही कडक नियम, EU Kids Act मध्ये काय आहे?

Latest Marathi News Update : वाघूळखेडा शिवारात शेतात काम करणाऱ्या मजुरांवर कोसळली वीज; दुर्घटनेत तीन महिलांचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT