कोकण

आगामी निवडणूका घेऊ नयेत, अन्यथा रस्त्यावर;ओबीसी समितीचा इशारा

सकाळ वृत्तसेवा

राजापूर (रत्नागिरी) : राज्य शासनाच्या हलगर्जीपणामुळे रद्द झालेले ओबीसींचे (OBC)राजकीय आरक्षण जोपर्यंत पुर्नस्थापित होत नाही, तोपर्यंत आगामी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणूका घेऊ नयेत, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा ओबीसी संघर्ष समन्वय समिती(obc committee, rajapur) राजापूरच्या वतीने देण्यात आला आहे. obc-(sangharsh-coordinating-committee-rajapur-warning-to-government-kokan-news)

ओबीसी संघर्ष समन्वय समितीचे राज्याध्यक्ष चंद्रकांत बावकर, राजापूर तालुकाध्यक्ष दीपक बेंद्रे यांच्या नेतृत्वाखाली तहसील कार्यालयाच्या आवारात जोरदार निदर्शने करीत ओबीसी संघर्ष समन्वय समितीने शासनाचे लक्ष वेधून घेतले. सर्वोच्च न्यायालयाने संस्थगित केलेले ओबीसींचे राजकीय आरक्षण राज्य सरकारने लवकरात लवकर पुनर्प्रस्थापित करावे, राज्यात ओबीसींची जातनिहाय जनगणना करावी, पदोन्नती कोटयातील मागासवर्गीयांची ३३ टक्के आरक्षित पदे भरण्यात यावीत, ओबीसींना पदोन्नतीमध्ये आरक्षण मिळावे, शासकीय सेवांमधील ओबीसींचा अनुशेष विनाविलंब भरण्यात यावा, बिंदूनामावलीला दिलेली स्थगित उठवावी, आदी मागण्यांबाबत निवेदन नायब तहसीलदार अशोक शेळके यांच्याकडे देण्यात आले. या वेळी अ‍ॅड. सुतार, मनोहर गुरव, प्रकाश मांडवकर आदी उपस्थित होते.

लाखो ई-मेल; सकारात्मक पावले उचलली नाहीत

सर्वोच्च न्यायालयाने संस्थगित केलेले ओबीसींचे राजकीय आरक्षण राज्य सरकारने पुनर्प्रस्थापित करावे व पदोन्नतीतील आरक्षण रद्द केल्याच्या निषेधार्थ ओबीसी जनमोर्चा आणि सहयोगी संस्थांच्यावतीने मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, ओबीसी कल्याण मंत्री, सामाजिक न्यायमंत्री यांना राज्यभरातून लाखो ई-मेल पाठविण्यात आले आहे. मात्र, त्यानंतरही राज्यशासनाने कोणतीच सकारात्मक पावले उचलली नाहीत. त्यामुळे हे आंदोलन छेडण्यात येत असल्याचे बावकर यांनी स्पष्ट केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

Rahul Narwekar : अलिबागमध्ये नेमकं काय घडलं होतं? राहुल नार्वेकरांनी सांगितला घटनाक्रम; संजय राऊतांनाही दिलं आव्हान

Beed News : बीडमध्ये ‘लेडी बाऊन्सर्स’ची एन्ट्री; बिल्डरभोवती महिला सुरक्षेची कडेकोट फौज! जमिनीच्या वादानंतर घेतला अनोखा निर्णय

SCROLL FOR NEXT