kokan sakal
कोकण

जयगड जवळ समुद्रात आज सकाळी एक तेलवाहू बार्ज उलटले

तटरक्षक दला आणि जिल्हा प्रशासन सतर्क असून खबरदारी बाळगण्यात आली आहे

सकाळ वृत्तसेवा

रत्नागिरी : तालुक्यातील जयगड जवळ समुद्रात आज सकाळी एक तेलवाहू बार्ज उलटले आहे. त्यामुळे समुद्र किनारा परिसरात तेल पसरण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. वाहून येणाऱ्या कोणत्याही वस्तुंना हात न लावण्याचा सूचना तटरक्षक दलाकडून देण्यात आल्या आहेत.

आज सकाळच्या दरम्यान, सिंगापूर कंपनीचं महाकाय तेलवाहू बार्ज बुडत असल्याचं नागरिकांच्या लक्षात आलं. हे बार्ज सिंगापूरचे असल्याची प्राथमिक माहिती आहे. ही घटना कशामुळे घडली याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. तर बार्जमधील वस्तू किना-यावर लागण्याची शक्यता असून त्यातील तेलसाठा पसरण्याची शक्यता आहे. त्यामुळे किनारीभागातील नागरीकांना सतर्कतेच्या सुचना देण्यात आल्या आहेत.

तटरक्षक दला आणि जिल्हा प्रशासन सतर्क असून खबरदारी बाळगण्यात आली आहे.जयगड समुद्रात पलटी झालेले सिंगापूर येथील तेलवाहु कंपनीचे बार्ज अजस्त्र लाटांच्या तडाख्याने सोमवारी मध्यरात्री गुहागर तालुक्यातील पालशेत समुद्रकिनारी आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Char Dham Yatra 2026 : चारधाम यात्रेदरम्यान मोबाईवर बंदी, पूजा-अर्चा, विधीचे शुल्कही वाढले, जाणून घ्या नवे नियम

MI vs PBKS Live: रोहित शर्माची माघार! मुंबई इंडियन्सच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये दोन बदल, सलामीला कोणती जोडी?

Ganesh Naik : वाघ-बिबट्यांच्या शिकारीमागे आंतरराष्ट्रीय जाळे; वनमंत्री गणेश नाईक यांचा गौप्यस्फोट

RTE Admission Issue : वसईत आरटीई प्रवेशावरून गोंधळ; टोकन न मिळाल्याने पालकांमध्ये संताप, भर उन्हात पालकांच्या लांबचलांब रांगा

Latest Marathi News Live Update : टीसीएस प्रकरणात आरोपींना तीन दिवसांची पोलीस कोठडी

SCROLL FOR NEXT