old parents face problem during corona in ratnagiri 
कोकण

आम्हाला होत नाही, मुलांनो घरी या; परदेशातील मुलांना वृद्ध पालकांची हाक

सकाळ वृत्तसेवा

चिपळूण (रत्नागिरी) : कोरोनामुळे इच्छा असतानाही गावातील अनेक जण एकाकी जगणाऱ्या वयोवृद्ध लोकांना मदत करू शकत नाहीत. अशा वातावरणात परदेशात असलेल्या मुलांनी आता परत आले पाहिजे, अशी अपेक्षा त्यांचे आई-वडील व्यक्त करीत आहेत. आम्हाला होत नाही, मुलांनो घरी या, अशी आर्त हाक ते देत असल्याचे सांजसोबतीचे अध्यक्ष डॉ. यतीन जाधव यांनी ‘सकाळ’ला दिली.

खडपोली (ता. चिपळूण) येथील गोपिका नावाच्या एका ८० वर्षीय वयोवृद्ध महिलेचा सांजसोबतीच्या कार्यकर्त्यांनी जीव वाचवला. ही महिला काही दिवसांपासून घरात एकटीच राहत होती. सांजसोबतीकडून तिला जीवनावश्‍यक वस्तू मिळत होत्या. पण जेवण तयार करून देणारा कोणी नव्हता. पोटात अन्न नसल्यामुळे तिची प्रकृती बिघडली. सांजसोबतने तिला अपरान्त रुग्णालयात आणून उपचार केले. त्या ठणठणीत झाल्या. या पार्श्‍वभूमीवर वयोवृद्ध लोकांसाठी काम करत असताना डॉ. जाधव यांना आलेला अनुभव त्यांनी कथन केला. घरची श्रीमंती आहे. मुले, नातवंडेही आहेत. मग वृद्धाश्रमात किंवा एकाकी जीवन का जगावे, असा सवाल अनेक वयोवृद्ध करीत असल्याचे डॉ. जाधव यांनी सांगितले. 

इच्छा असली तरी

ते म्हणाले, की एखाद्याचा मुलगा शिक्षणासाठी अमेरिकेत आहे. तेथेच त्याने नोकरी शोधून काम करायला सुरवात केली. नंतर लग्नही केले. लग्न झाल्यावर दोघे आशीर्वाद घेण्यासाठी इकडे आले. पुन्हा गेल्यावर वर्षातून एकदाच येतात. त्यांच्या आई-वडिलांचे वय ७० हून अधिक झाले आहे. यामुळे बाजारातून साहित्य, भाजीपाला आणता येत नाही. पूर्वी बाजूच्या शेजाऱ्यांना सांगितले तर ते आणून द्यायचे. आता कोरोनामुळे त्यांची इच्छा असली तरी कोणी मदत करीत नाहीत.

नागरिकांनी स्वमग्न राहू नये

शहरात फ्लॅट संस्कृती रुजत आहे. त्यामुळे जर तुम्ही बोलके नसाल किंवा स्वमग्न असाल तर अडचणी निर्माण होतात. बाजूला कोण राहते, काय करतात, घरात किती सदस्य आहेत, याची शेजाऱ्यांना काहीच माहिती नसते. यामुळे वृद्ध दांपत्यापैकी एकाचा तरी स्वभाव बोलका हवा. एकाकी राहणाऱ्या नागरिकांनी स्वमग्न राहू नये, असे आवाहन त्यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bharat Gogawale on Manoj Jarange Patil : "कोणी ऐऱ्यागैऱ्याने त्याचे श्रेय घेऊन ठाण्याला आव्हान देऊ नये,”, भरत गोगावलेंचे मनोज जरांगेंवर थेट आरोप

Fertilizer Allocation System : आधार, सातबारा अन् पिकानुसार ठरणार खतांचा कोटा ‘फ्रेमवर्क फॉर फर्टिलायझर सेल’ प्रणाली; वाळवा पंचायत समितीत खत विक्रेत्यांना प्रशिक्षण

Asian Games 2026: दीपिका सेहरावतचे रेकॉर्ड ब्रेकिंग गोल! थायलंडवर २०-१ असा दणदणीत विजय; १९८२ नंतर सुवर्णपदकाच्या शोधात

Marathi News Live Updates : पक्ष फोडणाऱ्या टोळीचे मुख्य सूत्रधार ज्ञानेश कुमारच, त्यांचा तातडीने राजीनामा घ्या; उद्धव ठाकरे आक्रमक

Uddhav Thackeray Eknath Shinde : वसंत डावखरे मानहानी प्रकरणाचा १७ वर्षांनी निकाल; उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदेंबाबत कल्याण न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल

SCROLL FOR NEXT