Old Person Death Due To Corona In Sawantwadi  
कोकण

कोरोनाने सावंतवाडीतील वृद्धाचा मृत्यू 

सकाळवृत्तसेवा

ओरोस ( सिंधुदुर्ग ) - कोरोना पॉझिटिव्ह असल्याने उपचार घेत असलेल्या सावंतवाडी येथील 70 वर्षीय वृद्धाचा आज जिल्हा रुग्णालयात मृत्यू झाला. त्यामुळे जिल्ह्यात कोरोना मृत्यूची संख्या 4 झाली आहे. आज नव्याने आणखी 10 व्यक्तींना कोरोनामुक्त झाल्याने घरी सोडले आहे. 94 व्यक्ती आतापर्यंत कोरोनामुक्त झाले आहेत. काल (ता. 14) सायंकाळनंतर एकही नव्याने रुग्ण आढळला नसल्याने जिल्ह्यात बाधित संख्या 154 राहिली आहे. 

काल (ता. 14) सायंकाळपर्यंत एकही कोरोना तपासणी नमुना नव्याने कोल्हापूर येथे पाठविण्यात न आल्याने 2 हजार 976 एवढीच राहिली आहे. प्रलंबित असलेल्या 133 अहवाल पैकी 58 नमुने अहवाल प्राप्त झाल्याने 75 अहवाल प्रलंबित राहिले आहेत. तर काल उशिरा कुडाळ तालुक्‍यातील नेरूर व सावंतवाडी शहरातील प्रत्येकी एका व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने जिल्ह्यातील रुग्णसंख्या 154 झाली आहे. तर आज कोरोनावर मात केलेल्या नवीन 10 व्यक्तींना घरी सोडले आहे. त्यामुळे कोरोनामुक्तचा आकडा 90 वर पोचला आहे. अजून एका बाधिताचा मृत्यू झाल्याने संख्या 4 झाली आहे. तर एक व्यक्ती मुंबई येथे उपचारासाठी गेल्याने सक्रिय रुग्णांची संख्या 55 झाली आहे. 

आज जिल्हा आरोग्य विभागातर्फे 4 हजार 671 एवढ्या व्यक्तींची आरोग्य तपासणी केली. त्यातील एकाही व्यक्तीला कोरोनाची लक्षणे मिळाली नसल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. धनंजय चाकूरकर यांनी दिली. संस्थात्मक क्वारंटाईनमधील 6 हजार 203 व्यक्तींचा कालावधी संपल्याने आता 17 हजार 927 येथे क्वारंटाईन आहेत.

शासकीय संस्थात्मक क्वारंटाईनमधील 15 व्यक्तींचा कालावधी संपल्याने आता केवळ 146 व्यक्ती शिल्लक राहिल्या आहेत. गाव पातळीवरील संस्थात्मक क्वारंटाईनमधील 6 हजार 267 व्यक्तींचा कालावधी पूर्ण झाला. त्यामुळे आता येथे 15 हजार 968 व्यक्ती क्वारंटाइन राहिल्या आहेत. नागरी क्षेत्रातील क्वारंटाईन व्यक्तींची संख्याही 79 ने कमी झाल्याने आता 1 हजार 813 व्यक्ती शिल्लक आहेत. 2 मेपासून आतापर्यंत जिल्ह्यात दाखल झालेल्या व्यक्तींची संख्या 96 हजार 172 एवढी झाली आहे. 

"त्या' व्यक्तीला अन्य आजारही 
जिल्ह्यात कोरोनाचा चौथा बळी ठरलेल्या सावंतवाडी येथील 70 वर्षीय व्यक्तीला मधुमेह, उच्च रक्तदाब, श्‍वसनदाह असे आजार होते. मुंबई येथून 10 जूनला ते जिल्ह्यात दाखल झाले होते. 
 

 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange: सरकार मराठा समाजापेक्षा मोठं नाही; 29 ऑगस्टच्या आंदोलनाबाबत जरांगेंचा थेट इशारा, अंतरवालीत येण्याचे आवाहन

Koyna Dam Water Level कोयना ९२ टक्के भरले, ६ दरवाजे ३ फुटापर्यंत उघडणार; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

Dombivli News: अल्पवयीन मुलीचा लोकलच्या धडकेत मृत्यू प्रकरणाला वेगळं वळण, पोस्टमार्टम रिपोर्ट समोर; तरुणाला अटक, ३ महिन्यापूर्वी...

Marathi News Live Updates : हैद्राबादमधील पेट्रोल आणि डिझेल रिक्षांचे ईव्हीमध्ये रूपांतर करण्यासाठी सरकाकडून १.५ लाख रुपयांपर्यंतचे अनुदान

AUS vs BAN 1st Test : बांगलादेशमुळे कसोटी क्रिकेटमध्ये भूकंप! ऑस्ट्रेलिया चारीमुंड्या चीत, भारताचा फायदा; वाचा WTC Final Scenario

SCROLL FOR NEXT