Olive Ridley breed have been released into the sea 
कोकण

ऑलिव्ह रिडले जातीच्या कासवाच्या १० पिल्लांना सोडण्यात आले समुद्रात....

सकाळ वृत्तसेवा

 हर्णे - दापोली वनविभागाने नेमलेले कर्मचारी व मुरुड मधील कासव मित्रांच्या सहकार्याने दापोली तालुक्‍यातील मुरुड गावातील समुद्र किनाऱ्यावर आज सकाळी ऑलिव्ह रिडले जातीच्या कासवाच्या १० पिल्लांना समुद्रात सोडण्यात आले.

दाभोळपासून केळशीपर्यंतच्या निसर्गरम्य आणि शांत समुद्रकिनाऱ्यावर ऑलिव्ह रिडले जातीची कासवे अंडी घालण्यासाठी येतात. त्यांनी घातलेल्या या अंड्यांचे संरक्षण व्हावे यासाठी दापोली वनविभागाकडून कासवमित्रांच्या सहकार्याने ही अंडी घरट्यांमध्ये संरक्षित केली जातात. या वर्षीच्या मोसमात मुरुड समुद्रकिनारी एकूण १३ घरटी तयार झालेली असून प्रत्येक घरट्यात सुमारे १०० ते १२० अंड्यांचे संवर्धन करण्यात आले आहे. येथील वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी ती सुरक्षित ठेवली आहेत. ५४ दिवसांपूर्वी पासूनच या अंड्यांचे संवर्धन सुरू झाले आहे.

आज सकाळी या संवर्धित केलेल्या घरट्यातून १० पिल्ले बाहेर आली. त्यांना गावातील वनविभागाचे कर्मचारी राजेश शिगवण, नाना माने, सरपंच सुरेश तुपे, साहिल तुपे, राजेश नरवणकर यांनी समुद्रामध्ये सोडले. आता ही मोहीम हाती घेण्यात आली असून संरक्षित केलेल्या कासवाच्या अंड्यातून कासवांची पिल्ले बाहेर येण्यास सुरवात झाली आहे.

 "आज मुरुड समुद्र किनारी कासवाची पिल्ले समुद्रात सोडण्यात आली. ऑलिव्ह रिडले ही कासवाची जात समुद्रात असणे नैसर्गिक दृष्ट्या अत्यंत गरजेचं आहे. कारण याच्यामुळे पर्यावरणाचं संतुलन राखलं जातंय. या कासवांच्या बाबतीत अस संगितले जाते की  अंड्यातून बाहेर पडल्यानंतर या पिल्लांना ज्याठिकाणाहून समुद्रात सोडलं जात तिथेच पुन्हा ही कासव अंडी घालायला येतात. त्यामुळे दरवर्षी या मुरुड समुद्रकिनाऱ्यावरून अशीच ही कासवाची पिल्ले समुद्रात सोडली जातात. अशीच आज सकाळी ६.३० च्या सुमारास सरपंच, ग्रामस्थ, व वनविभाचे कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत १० कासवांची पिल्ले समुद्रात सोडलेली आहेत. आता यापुढे जसजशी पिल्ले बाहेर येतील त्यांच्यावर लक्ष ठेऊन त्यांना समुद्रामध्ये सोडण्यात येणार आहे "; असे येथील स्थानिक नागरिक व एन.के. वराडकर हायस्कुलचे शिक्षक राजेश नरवणकर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Government Websites : सर्व सरकारी संकेतस्थळे आता होणार मराठीत!

Ashish Shelar : ठाकरेंनी आले‘पाक’ खाणे बंद करावे

CM Devendra Fadnavis : पाच लाखांवरील उपचारांसाठी निधी; उपचारांची संख्या दोन हजारांवर वाढणार

Mutual Fund: पुढील 10 वर्षांत स्मॉल-कॅप, मिड-कॅप की लार्ज-कॅप, कोणता फंड सर्वाधिक परतावा देऊ शकतो?

India-Ukraine: भारताकडून येणाऱ्या डिझेलवर युक्रेन घालणार बंदी? रशियाच्या तेल खरेदीमुळे अनेक देशांनी केलं लक्ष्य

SCROLL FOR NEXT