file photo 
कोकण

दोन हजाराची लाच घेतांना कोतवाल जाळ्यात

सुनील पाटकर

महाड (रायगड): महाड तालुक्यातील किंजळोली बुद्रूक येथील तलाठी कार्यालयात काम करणा-या कोतवालाला महाड तहसील कार्यालयाबाहेर दोन हजार रुपयांची लाच स्विकारतांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आज (शुक्रवार) दुपारी रंगेहाथ पकडले. यामुळे महाड महसुल कार्यालयातील भ्रष्टाचार पुन्हा एकदा उघड झाला आहे.

जगदिश लक्ष्मण साळवी असे या कोतवालाचे नाव असून, तलाठ्याच्या नावाचा वापर करुन त्यांने या लाचेची मागणी केली होती. या बाबत तक्रार दाखल केलेल्या इसमाला आपल्या वडिलोपार्जित मिळकतीच्या सात बारावर वारस नोंद करून घ्यायची होती. परंतु किंजळोली बुद्रूक येथील तलाठी सजात काम करणा-या जगदिश साळवी यांने ही नोंद करुन घेण्यासाठी तलाठ्याला दोन हजार रुपये द्यावे लागतील असे सांगितले. तक्रारदाराने या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे रितसर तक्रार दाखल केली. यानंतर या विभागाचे उपअधिक्षक विवेक जोशी यांनी महाड तहसील कार्यालयाबाहेर सापळा रचून लाचेची रक्कम स्विकारताना साळवीला रंगेहाथ जाळ्यात पकडला. महाड तालुक्यात यापूर्वी तीन मंडल अधिकारी व एक तलाठी लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात सापडूनही महसूल विभागातील लाच प्रकरणे थांबतांना दिसत नाहीत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ऐन गर्दीच्या वेळी एसी लोकलच्या टपावर तरुणाचा थरारक प्रवास, वाहतूक कोलमडली, रेल्वे स्थानकावर प्रवाशांचा खोळंबा; Video Viral

Latest Marathi News Live Update : मोबाईल चोरी अपयशी ठरल्याने महिलेवर हल्ला

Tailoring Business : रेडिमेडच्या जमान्यात शिवणकाम व्यवसायाला नवसंजीवनी! ‘परफेक्ट फिटिंग’साठी महिलांची पसंती

Sudhagad Rutuja Patre News : रामवाडीची ऋतुजा पातेरे राज्यस्तरीय धावपटू म्हणून चमकली; नाशिक स्पर्धेतील रौप्यपदकाने ठाणे-रायगडचा मान उंचावला

Nashik News : टीसीएस अत्याचार प्रकरण! निदा खान ‘अटकपूर्व’साठी उच्च न्यायालयात? ‘एसआयटी’च्या हाती मात्र लागेना

SCROLL FOR NEXT