boat esakal
कोकण

कोकण - 6 खलाशांसह जयगडमधील नौका बेपत्ता

पाच दिवसांपासून कुणाचाही संपर्कच नाही

सकाळ वृत्तसेवा

स्थानिक मच्छीमारांनी शोध मोहीम सुरू केली आहे.

रत्नागिरी : तालुक्यातील जयगड येथील मासेमारीसाठी गेलेली नविद-२ ही नौका त्यावरील तांडेल व पाच ते सहा खलाशांसह बेपत्ता झाली. पाच दिवसांपासून त्यांच्याशी संपर्क न झाल्याने नौकेच्या मालकाने जयगड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. स्थानिक मच्छीमारांनी शोध मोहीम सुरू केली आहे.

नासीर हुसैन मिया संसारे यांच्या मालकीची ‘नविद २’ ही ती नौका आहे. २६ ऑक्टोबरला ही नौका मासेमारीसाठी जयगडहून निघाली. दोन ते तीन दिवसांमध्ये मासेमारी करून नौका सर्वसाधारणपणे परत येते; परंतु यावेळी ती परत आलीच नाही किंवा तांडेलसह अन्य खलाशांचा संपर्कच झाला नाही. संसारे यांनी संपर्क साधण्याचा अनेकदा प्रयत्न केला. सोशल मीडियावरही त्याची माहिती आणि फोटो व्हायरल केले; मात्र अजूनही कुणाचाच संपर्क झालेला नाही. या नौकेवर नासीर शेठ तर तांडेल दगडू आहे. गोविंद, दत्ता, अमोल, सूर्या, अनिल (यांची पूर्ण नावे मिळालेली नाही. सर्व रा. साखरीआगर) हेही नौकेवर आहेत. ते अजून परत आलेले नाहीत. या नौकेबद्दल किंवा व्यक्तींबद्दल काही माहिती मिळाल्यास जयगड पोलिस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

मच्छीमार शोधासाठी बाहेर

‘नविद २’ ही नौका बेपत्ता झाल्याने जयगड आणि साखरीआगर परिसरातील वातावरण अतिशय चिंतेचे आहे. बेपत्तांचा शोध घेण्यासाठी काही स्थानिक मच्छीमार देखील बाहेर पडले आहेत. पाच दिवस झाले तरी ‘नविद २’ नौकेवरील कुणाशीही संपर्क न झाल्याने चिंता वाढली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJI Suryakant : १ डिसेंबरला नेमकं काय होणार? CJI सूर्यकांतांचा गूढ इशारा… सुप्रीम कोर्टात मोठा बदल की काहीतरी वेगळंच?

Latest Marathi News Live Update : पंतप्रधान मोदी आज कर्नाटक दौऱ्यावर; उडुपीतील श्रीकृष्ण मठाला देणार भेट

विराट, रोहित अन् रिषभ पंत...! धोनीच्या घरी सजली भारतीय क्रिकेटपटूंची 'मैफिल', पाहा VIDEO

Nagpur Accident : शहरात अपघातांसह मृत्यूंची संख्या घटली; आपरेशन ‘यू-टर्न’चे यश

TET Paper Leak : 'टीईटी' पेपर फुटला! परीक्षेपूर्वीच प्रश्नपत्रिका बाहेर, विद्यार्थ्यांकडून कबुली; २६ संशयितांची नावे निष्पन्‍न...

SCROLL FOR NEXT