One Dead In Sindhudurg Due To Corona New Six patient Found 
कोकण

सिंधुदुर्गात कोरोनाने एकाचा मृत्यू़; नवे 6 रूग्ण

सकाळवृत्तसेवा

ओरोस ( सिंधुदुर्ग ) - जिल्ह्यात आज कोरोनाने वैभववाडी तालुक्‍यातील कोकीसरे येथील 70 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. नव्याने सहा कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. 35 रुग्णानी रूग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे घरी जाणाऱ्या रुग्णांची संख्या 6 हजाराच्या वर गेली आहे. आतापर्यंत 6 हजार 25 झाली. 

आतापर्यंत मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या 173 झाली आहे. तर सद्यस्थितीत जिल्ह्यात सक्रिय 164 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. प्रकृती चिंताजनक असलेल्या रुग्णांची संख्या 4 एवढी आहे, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीमंत चव्हाण यांनी दिली. 

जिल्ह्याचा मृत्युदर हा राज्याच्या तुलनेपेक्षा जास्त आहे. रिकव्हरी रेट हि कमी आहे. सावंतवाडी तालुक्‍यात सर्वाधिक मृत्यू झाले आहेत. कणकवली तालुक्‍यात सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत. आतापर्यंत 6 हजार 368 रुग्ण सापडले आहेत. तसेच आतापर्यंत मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या 173 झाली आहे. आतापर्यंत 34 हजार 855 आर टी पी सी तपासणी करण्यात आली असून त्यापैकी 4418 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. 24 हजार 716 नमुन्यांची अँटी जन टेस्ट करण्यात आली असून त्यापैकी 2061 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. 

तालुकानिहाय पॉझिटीव्ह रूग्ण असे

 देवगड तालुक्‍यात 440, दोडामार्ग - 360, कणकवली - 1949, कुडाळ - 1443, मालवण - 580, सावंतवाडी - 835, वैभववाडी - 184, वेंगुर्ले - 552 तर जिल्ह्याबाहेरील रुग्णांची संख्या 25. जिल्ह्यात 164 रुग्ण सक्रिय असून यात देवगड 2, दोडामार्ग 7, कणकवली 60, कुडाळ 49, मालवण 32, सावंतवाडी 14, वैभववाडी 1, वेंगुर्ले 5, जिल्ह्याबाहेरील 7 रूग्णांचा समावेश आहे. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah Kolhapur Visit : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज रात्री कोल्हापुरात दाखल होणार; अंबाबाई मंदिराबाबत मोठा निर्णय, पाहा मिनिट-टू-मिनिट कार्यक्रम

Mumbai BEST Bus Strike : मुंबईत बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप; रिक्षा चालकांकडून प्रवाशांची लूट, प्रवाशांमध्ये संताप

Lote MIDC Water Crisis : कोकणातील उद्योगांवर 40 वर्षांत प्रथमच मोठं संकट! 15 जूनपासून एमआयडीसीचे पंपिंग स्टेशन बंद; पुढील दोन दिवसांत सर्व कंपन्या कुलूप लावणार

साखर कमी, अँटीऑक्सिडंट्स भरपूर! रोगप्रतिकारशक्ती वाढवणारं जांभूळ मध 'या' आजारासाठीही ठरतं वरदान

Stock Market Today: एका रिपोर्टने शेअर बाजारात घातला धुमाकूळ! Infosysy, TCS, Tech M कोसळले; नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT