कोकण

रत्नागिरी : फावड्याने केलेल्या हल्ल्यात युवक ठार

सकाळ वृत्तसेवा

देवरुख - शेजाऱ्याने फावड्याने केलेल्या हल्ल्यात एक जण जागीच ठार झाला तर एक महिला गंभीर जखमी झाली आहे. ही घटना आज दुपारी बेलारी साप्तेवाडीत घडली. संदीप अर्जुन साप्ते (३०) असे मृत युवकाचे नाव आहे तर त्याची आई अरुणा अर्जुन साप्ते (५०) या गंभीर जखमी झाल्या आहेत. त्यांची प्रकृती चिंताजनक असून त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

याबाबत घटनास्थळावरुन मिळालेली माहिती अशी, घटनेतील मयत आणि संशयित यांची बेलारी साप्तेवाडीत शेजारी घरे आहेत. आज सकाळी संदीपचे वडील अर्जुन हे कामानिमित्त देवरुखला गेले होते. याचा फायदा घेत सखाराम बाबाजी साप्ते (५०) याने संदीपच्या घरात घुसून त्याला फावड्याने मारण्यास सुरुवात केली. यावेळी संदीपची आई अरुणाने त्याला अडविण्याचा प्रय़त्न केला. सखारामने तिलाही फावड्याने मारहाण केली.

दरम्यान संदीपवर फावड्याचे ५ ते ६ वार झाले यात त्याच्या डोक्याला गंभीर इजा झाल्याने तो जागीच ठार झाला. या हल्ल्यात अरुणा या सुद्धा गंभीर जखमी झाल्या आहेत. 

संदीपच्या घरात सुरु असलेली गडबड ऐकून शेजारी धावले मात्र तोपर्यंत उशीर झाला होता. संदीप व त्याच्या आईला उपचारासाठी देवरुखला आणण्यात आले मात्र संदीपला मृत घोषित करण्यात आले. 

घटनेची माहिती समजताच  देवरुख पोलिस निरीक्षक श्री पाटील आणि सहकारी घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळी पंचनामा करण्यात आला. यावेळी पोलिसांनी सखारामचा शोध घेतला असता तो सापडला नाही. या घटनेची नोंद करण्याचे काम देवरुख पोलीस ठाण्यात सुरु आहे.  देवरुख ग्रामीणमध्ये शवविच्छेदनाची सोय नसल्याने संदीपचा मृतदेह विच्छेदनासाठी संगमेश्वरला पाठवण्यात आला आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin News : रस्त्याच्या कामावरून वाद; लोखंडी रॉडने मारहाण करणारे तिघे अहिल्यानगर हद्दीजवळून ताब्यात...

Dog Bite : पिसाळलेल्या कुत्र्याचा धुमाकूळ; आळे परिसरातील बारा जणांचा घेतला चावा; नऊ जण गंभीर

Pune News : राज्यातील ऑनलाइन कामकाज ठप्प; कृषी कर्मचाऱ्यांनी लॅपटॉप जमा केले, आंदोलन तीव्र

Vastu Tips: घरात क्रिस्टल पिरामिड ठेवल्यावर काय होते? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या योग्य दिशा, फायदे अन् महत्त्वाचे नियम...

FDA Watch : प्रसादवाटप करणाऱ्या मंडळांना ‘एफडीए’ची नोंदणी बंधनकारक; प्रसादावर ‘एफडीए’ची नजर

SCROLL FOR NEXT