One injured in an accident at Malgaon 
कोकण

मळगाव मोटार-दुचाकी अपघातात एक गंभीर

भूषण आरोसकर

सावंतवाडी (सिंधुदुर्ग) - सावंतवाडी-रेडी राज्यमार्गावरील मळगाव पेट्रोलपंपासमोरील वळणावर मोटारीची दुचाकीला जोरदार धडक बसली. या धडकेत दुचाकीस्वार विशाल शरद हरमलकर (26 रा. तळवणे, वेळवेवाडी) हा गंभीर जखमी झाला. ही घटना आज दुपारी घडली. याबाबत येथील पोलिस ठाण्यात नोंद झाली. तर माजगाव गरड परिसरात चालकाचा ताबा सुटल्याने कार रस्त्याकडेला पलटी झाली. 

विशाल हरमलकर हा दुचाकीने (एम एच 07 6225) तळवणेतून सावंतवाडीच्या दिशेने येत होता. मळगाव येथील पेट्रोल पंप लगतच्या वळणावर आला असताना समोरून आलेल्या मोटारीची (जीए 08 एन 9881) जोरदार धडक दुचाकीला बसली. या धडकेत दुचाकीस्वार गाडीवरून फेकला गेल्याने त्याच्या डोक्‍याला व पायाला गंभीर दुखापत झाली.

अपघातानंतर त्याला उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र प्रकृती गंभीर असल्याने त्याला अधिक उपचारार्थ "गोमेकॉ'त हलविण्यात येणार असल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली. सहाय्यक पोलिस निरीक्षक अण्णासो बाबर, सहाय्यक उपनिरीक्षक गुरुदास बाबर, सहाय्यक पोलिस धनंजय नाईक यांनी पंचनामा केला. 

मोठा अनर्थ टळला 
गरड-मज्जिद गरड परिसरात कार चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने गाडी रस्त्याच्या कडेला पलटी झाली. अपघातग्रस्त ठिकाणी घरे आहेत; मात्र त्या ठिकाणी अपघाताच्या वेळी कोणी नसल्यामुळे मोठा अनर्थ टळला. हा अपघात दुपारच्या सुमारास घडला. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही; मात्र गाडीचे मोठे नुकसान झाले आहे. 

संपादन - राहुल पाटील

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: अमेरिकेने व्याजदर वाढवले अन् एकाच दिवसात सोन्याच्या भावात मोठा बदल! तुमच्या शहरातील आजचा ताजा भाव पाहा

Ladki Bahin Yojana Update : लाडकी बहीण योजनेत 5 हजार कोटींचा घोटाळा? सुप्रिया सुळेंच्या गंभीर आरोपामुळे राजकीय वर्तुळात खळबळ, आकडेवारीतील फरकावरून सरकारवर चौफेर टीका

तुझ्यासाठी प्रेमाची व्याख्या काय? तेजश्री प्रधानने साध्या सरळ शब्दात सांगितलं; म्हणते- इतका जवळचा एक माणूस...

Marathi News Live Updates : महाराष्ट्रात iPhone 18 Pro आणि iPhone 18 Pro Max ची अधिकृत विक्री सुरू; मुंबईतील Apple Store बाहेर ग्राहकांची मोठी गर्दी

Petrol Diesel Price: UPI वरील नवीन चार्जनंतर पेट्रोल-डिझेलचे भाव वाढणार? पंप डीलर्सचा सरकारला प्रस्ताव; आज कितीला मिळतंय?

SCROLL FOR NEXT