one lady in konkan whose property in crores run a gram panchayat election in ratnagiri 
कोकण

कोट्यवधीची मालमत्ता असलेल्या महिला उमेदवाराची ग्रामपंचायतीत रंगतीये चर्चा

सकाळ वृत्तसेवा

रत्नागिरी : शिवसेना - भाजपमध्ये जोरदार चुरस असल्याने तालुक्‍यातील मिऱ्या ग्रामपंचायतीची निवडणूक प्रतिष्ठेची झाली आहे. बिनविरोधचा प्रयत्न फसल्यानंतर तेथे प्रचाराचा धुरळा उडत आहे. याचबरोबर ही ग्रामपंचायत चर्चेत आली आहे ती कोट्यवधीची मालमत्ता असलेल्या एका महिला उमेदवारामुळे. आदिती भैय्या भाटकर असे त्या महिला उमेदवाराचे नाव आहे. 

मिऱ्या ग्रामपंचायत ही ११ सदस्यांची आहे. भाजपचे माजी आमदार बाळ माने यांच्या होमपिचवरील ही ग्रामपंचायत असल्याने तेथे यापूर्वी भाजपचे वर्चस्व होते; मात्र शिवसेनेने हे वर्चस्व मोडीत काढत ही ग्रामपंचायत ताब्यात घेतली आहे. कधी भाजप, तर कधी शिवसेना अशी सत्तेच्या खुर्चीची अदलाबदल होत असते. या पंचवार्षिक निवडणुकीला ही ग्रामपंचायत बिनविरोध करण्याचा प्रयत्न दोन्ही पक्षांकडून झाला.

अडीच-अडीच वर्षे सरपंचपदाचा फॉर्म्युला ठरला. पण माशी शिंकली आणि बोलणी फिस्कटली. त्यामुळे ११ जागांवर आता शिवसेना, भाजपचे उमेदवार असून काही अपक्षांचाही यात समावेश आहे. या ग्रामपंचायतीची सर्वात जास्त चर्चा आहे ती एका महिला उमेदवाराची. उमेदवारी अर्ज सादर करताना स्थावर व जंगम मालमत्तेची इत्यंभूत माहिती निवडणूक विभागाला प्रतिज्ञापत्राद्वारे द्यावी लागते. त्यामध्ये मिऱ्या येथील तरुण कार्यकर्ता भैय्या भाटकर यांच्या पत्नी आदिती यांची. त्या प्रभाग क्र. ४ मधून निवडणूक रिंगणात असून ‘शिट्टी’ हे चिन्ह त्यांना मिळाले आहे. त्यांनी प्रतिज्ञापत्रात दाखविलेली मालमत्ता कोट्यवधीची असल्याचे नमूद केले आहे.

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thane News: संतापजनक! शाळेच्या टॉयलेटमध्ये रक्त दिसलं, मासिक पाळीच्या संशयातून मुलींना विवस्त्र केलं अन्...; ठाण्यातील प्रकारानं खळबळ

Video Viral: शुभमन गिलला समोरून जाताना पाहून काय होती सारा तेंडुलकरची रिऍक्शन? पाहा

Viral Video: धक्कादायक! लिफ्टमध्ये लहान मुलाला जबर मारहाण; ठाण्यातील संतापजनक घटना, घटनेचा व्हिडिओ व्हायरल

मराठी चित्रपटसृष्टीच्या मागण्यांबाबत राष्ट्रवादी सांस्कृतिक चित्रपट विभागाने घेतली सांस्कृतिक मंत्र्यांची भेट

धक्कादायक! एकाच कुटुंबातील चौघांचा जीव देण्याचा प्रयत्न, तिघांचा मृत्यू; घटनेमागचं कारण काय?

SCROLL FOR NEXT