one leopard dies in lanja ratnagiri by mistake 
कोकण

डुकरासाठी फासका लावला आणि हाकनाक बिबट्याचा बळी गेला

रवींद्र साळवी

लांजा (रत्नागिरी) : डुकरासाठी लावलेल्या फासकीत अडकून मादी बिबट्याचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी लांजा शहरातील मधली कुंभारवाडी येथे घडली. दरम्यान, या घटनेनंतर फासकीचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. 

मंगळवारी सकाळी लांजा शहरातील मधली कुंभारवाडी येथील काही स्थानिक ग्रामस्थांना येथील पुरुषोत्तम आत्माराम कुंभार यांच्या मालकीच्या जागेत ओढ्यालगत असलेल्या एका झाडाला अज्ञात व्यक्तींनी लावलेल्या फासकीत अडकून मृतावस्थेतील बिबट्या आढळून आला होता. याची खबर ग्रामस्थांनी लांजातील वनखात्याला दिली. त्यानंतर त्या ठिकाणी परिक्षेत्र वन अधिकारी प्रियांका लगड, लांजा वनपाल सागर पाताडे हे सहकाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. सदरचा बिबट्या मादी जातीचा असून तो चार ते पाच वर्षे वयाचा आहे. 

हा बिबट्या रात्री या ठिकाणी फासकीत अडकला असल्याचा अंदाजही त्यांनी व्यक्त केला आहे. दरम्यान वनखात्याच्या अधिकाऱ्यांनी वनरक्षक विक्रम कुंभार, वनमजूर खेडेकर तसेच प्राणीमित्र सचिन जाधव व अन्य ग्रामस्थांच्या सहकार्याने मृत बिबट्याची फासकीतून सोडवणूक केली. त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रत्नागिरी येथे नेण्यात आला आहे. दरम्यान डुकरांसाठी लावलेल्या फासकीत अडकून या बिबट्याचा मृत्यू झाल्याच्या घटनेनंतर फासकीचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. 

संपादन - स्नेहल कदम         

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nagpur : एसबीएल स्फोटात १८ कामगारांच्या चिंधड्या, गाठोड्यात बांधून आणले मानवी अवयव; २४ जण गंभीर जखमी

Khadakwasla Backwater Death : पुणे हादरले! खडकवासला धरणात तरंगताना आढळला तरुणाचा मृतदेह; 'त्या' संध्याकाळी नेमकं काय घडलं?

भरपाई म्हणून पीडितेला ‘मॅकबूक’ द्या! ‘पाेक्साे’चा गुन्हा रद्द करत हायकोर्टाचे आदेश, पुण्यातील ५२ वर्षीय आरोपीला दिलासा

इस्रायल इराण युद्धाचा थेट परिणाम, कच्च्या तेलाच्या दराचा भडका; पेट्रोल-डिझेल महाग होणार?

Iran vs Israel युद्ध आणखी भडकणार! इराणला पाठिंबा देत हिजबुल्लाहचे इस्रायलवर हल्ले, इस्रायलचा लेबनॉनच्या राजधानीतही विध्वंस

SCROLL FOR NEXT