one man shift isolation ward dapoli 
कोकण

तबलिगीशी संबंधितांच्या संपर्कात आलेली 'ती' व्यक्ती आयसोलेशनमध्ये 

सकाळ वृत्तसेवा

दापोली : दिल्ली येथील तबलीगी कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी दापोली तालुक्यातील एकही व्यक्ती गेली नसल्याचे बोलले जात असले तरी दिल्ली येथून अहमदनगर येथे आलेल्या व्यक्तींच्या संपर्कात दाभोळ येथून गेलेली एक व्यक्ती आल्याचे समोर आले आहे. संबंधीत व्यक्तीला आज दक्षतेची उपाययोजना म्हणून दापोलीच्या उपजिल्हा रुग्णालयातील आयसोलेशन कक्षात ठेवण्यात आले आहे.


याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, दापोली तालुक्यातील दाभोळ येथील एक व्यक्ती अहमदनगर येथे 11 ते 13 मार्च दरम्यान आयोजित केलेल्या धार्मिक कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी गेला होता. तेथे तो दिल्ली येथून आलेल्या व्यक्तींच्या संपर्कात आला होता.

दिल्ली येथील निजामुद्दीन भागातील तबलीगिनच्या कार्यक्रमाबाबत चर्चा सुरू झाल्यावर जिल्हा प्रशासन व पोलीस प्रशासनाने दिल्ली येथे गेलेल्यांचा शोध सुरू केला होता, मात्र या शोधात दापोली तालुक्यातील कोणी गेल्याचे निष्पन्न झाले नाही. मात्र या तपासात दाभोळ येथील एक व्यक्ती अहमदनगर येथे गेल्याची माहिती पुढे आल्यावर दाभोळ सागरी पोलिसांनी या व्यक्तीला ताब्यात घेऊन दापोली येथील उपजिल्हा रुग्णालयातील आयसोलेश कक्षात दाखल केले आहे.
 दरम्यान, दुबई येथून आलेल्या दोन व्यक्तींनाही आयसोलेशन कक्षात दाखल करण्यात आले आहे.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Baramati By Election : सुनेत्रा पवार यांनी बारामती पोटनिवडणुकीसाठी दाखल केला उमेदवारी अर्ज ; अजितदादांच्या आठवणीने डोळ्यांत तरळले अश्रू

Alphonso Mango In Kolhapur : कोकणचा राजा महागणार? कोल्हापूरच्या बाजारात हापूसची आवक ८५ टक्क्यांनी घटली; 'हे' आहे मुख्य कारण

CCTV Rules 2026 : काय भारतात लाखो CCTV कॅमेरे सुरक्षित आहेत? Qubo CEO नी दिला हॅकिंगचा इशारा, तुमचा कॅमेरा सेफ आहे का? 'असे' करा चेक

Satara Politics : भाजपची 'अफाट' किमया! संख्याबळ कमी असतानाही साताऱ्यात सत्ता कशी मिळवली? वाचा सविस्तर इनसाईड स्टोरी

राष्ट्रावादीच्या मेळाव्यात बॅनरवर शरद पवारांचा फोटो, तर चाकणकर अनुपस्थित; चर्चांना उधाण

SCROLL FOR NEXT