one more corona patient in khed ratnagiri 
कोकण

कळंबणी उपजिल्हा रुग्णालयातील आणखी एका नर्सला कोरोनाची बाधा...

सकाळ वृत्तसेवा

खेड (रत्नागिरी) : कोरोना रुग्णांवर उपचार केल्या जाणाऱ्या तालुक्यातील कळंबणी उपजिल्हा रुग्णालयातील आणखी एका नर्सचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याने वैद्यकिय कर्मचाऱ्यांसह रुग्णालयात उपचारांसाठी येणारे सर्वसाधारण रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांमध्ये घबराट निर्माण झाली आहे. या आधीही या रुग्णालयातील एका नर्सचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला होता.

खेड तालुक्यातील सामान्य रुग्णांसाठी कळंबणी उपजिल्हा रुग्णालय हे एकमेव शासकिय रुग्णालय आहे. अतिशय कमी खर्चात याठिकाणी रुग्णांवर उपचार होत असल्याने या रुग्णालयात ग्रामीण भागातील रुग्णांची नेहमीच मोठी गर्दी होत असते. शेतीची कामे सुरु झाली की विंचू किंवा सर्पदंश झालेल्या रुग्णांची उपचारांसाठी येणारी संख्या देखील मोठी आहे. जिल्ह्यात कोरोनाचा प्रादर्भाव सुरु झाल्यानंतर खेड आणि आजुबाजूच्या तालुक्यांमध्ये आहळणाऱ्या कोरोनाबाधीत रुग्णांवर याच रुग्णालयात तयार करण्यात आलेल्या आयसोलेशन वार्डमध्ये उपचार केले जावू लागले. त्यामुळे या रुग्णालयात उपचारांसाठी येणारे सर्वसाधारण रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले.

दरम्यान या रुग्णालयात काम करणाऱ्या एका नर्सचा  कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यामुळे रुग्णालयात काम करणाऱ्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांसह , सर्वसाधारण रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांचा जीव टांगणीला लागला. सुदैवाने अल्पावधीतच त्या नर्सने कोरोनावर मात केल्याचे स्पष्ट झाले आणि साऱ्यांचाच जीव भांड्यात पडला. मात्र आता पुन्हा एकदा याच रुग्णालयातील आणखी एका नर्सचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने या रुग्णालयात उपचार घेण्यासाठी जावे कि न जावे असा संभ्रम सर्वसाधारण रुग्णांसह त्यांच्या नातेवाईकांमध्ये निर्माण झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shashi Tharoor: केरळमध्ये ‘ऍक्शन सीन’ रिअल! शशी थरूर यांच्या ताफ्यावर थरारक हल्ला; सुरक्षा रक्षक जखमी, खासदार थोडक्यात बचावले!

Sangli Sambhaji Maharaj statue : सांगलीत छत्रपती संभाजीराजेंचा पुतळा काढल्यानंतर पोलिसांचा मोठा बंदोबस्त; बैठकीत होणार निर्णय, दंगल काबू पथक घटनास्थळी

Chhatrapati Sambhajinagar: नव्या २९ रेल्वेत संभाजीनगर नाही!;दक्षिण-मध्य रेल्वेचा पुन्हा अन्याय; सिकंदराबाद, काचीगुडा, तिरुपतीवर भर

US 100% Tariff: ट्रम्पचा मोठा निर्णय! आयात औषधांवर 100% टॅरिफ; भारतावर काय होणार परिणाम?

आणखी एक चूक अन् Shreyas Iyer वर बंदी! CSK विरुद्धच्या सामन्यांनंतर IPL ची कडक कारवाई; २४ लाखांचा दंड

SCROLL FOR NEXT