One person injured after falling from Sarasgad fort pali raigad
One person injured after falling from Sarasgad fort pali raigad sakal
कोकण

सरसगड किल्ल्यावरून पडून एक व्यक्ती जखमी

अमित गवळे - सकाळ वृत्तसेवा

पाली : पालीतील सरसगड किल्ल्यावर गेलेले अंबरनाथ येथील संजीव पाटील हे शुक्रवारी (ता.23) दुपारी पायऱ्यांवरून घसरून खाली पडले. यावेळी त्यांना देऊळवाडा येथील तरुण व नागरिकांनी खाली आणून लागलीच रुग्णालयात नेले.

संजय पाटील यांच्या हाताला व पाठीला दुखापत झाली आहे. त्यामुळे येथील नागरिक व तरुणांनी त्यांना कापडी स्ट्रेचरवर उचलून खाली आणले. व उपचारासाठी पालीतील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले. संजय पाटील यांना किल्ल्यावर खाली आणण्यासाठी देऊळवाडा येथील अक्षय दंत ( भारतीय सैन्यदल), समीर वरंडे, ओंकार जाधव, दिशांत वरंडे, शुभम वरंडे, केदार वरंडे, प्रकाश वरंडे, ज्ञानेश्वर जगताप, अक्षय दंत, अविनाश दंत, आर्यन जाधव, सागर वरंडे,

गौरव वाघमारे, प्रदीप गोळे, विनायक राऊत, सूरज वरंडे, गौरव वाघमारे, अविनाश दंत, कुणाल सोनावळे, ऋषिकेश पोंगडे, बंटी राऊत, भाई राऊत आदी ग्रामस्थ आणि तरुणांनी मदत केली. किल्ल्यावरून कोणी खाली पडले आहे हे कळताच तात्काळ हे तरुण व नागरिक गडावर गेले आणि जखमी इसमास सुखरूप गडावरून खाली आणले व दवाखान्यात नेले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Virtual Campaign: अटक केलेल्या राजकीय नेत्यांना व्हर्च्युअल प्रचाराची परवनगी मागणारी याचिका हायकोर्टाने फेटाळली

Goldy Brar Death: सिद्धू मूसवाला हत्याकांडाच्या मास्टरमाईंडची अमेरिकेत गोळ्या झाडून हत्या

Bumble : आता 'लेडीज फर्स्ट' नाही, तर पुरूषांनाही मिळणार समान संधी.. बम्बल डेटिंग अ‍ॅपने केली मोठी घोषणा!

Salman Khan : गोळीबार प्रकरणातील आरोपीचा उपचारादरम्यान मृत्यू ; गळफास घेऊन आयुष्य संपवण्याचा केला होता प्रयत्न !

China Highway Collapsed: चीनमध्ये भीषण दुर्घटना! हायवे कोसळल्यानं 19 ठार, डझनभर जखमी

SCROLL FOR NEXT