Anuskura Ghat esakal
कोकण

Anuskura Ghat : तब्बल 24 तासांनंतर अणुस्कुरा घाटातून एकेरी वाहतूक सुरू; दरड काढण्यात बांधकाम विभागासह सहकारी यंत्रणेला मोठं यश

शुक्रवारी (ता. १४) सायंकाळी या मार्गावरील एका बाजूची दगड व माती काढून एकेरी वाहतूक सुरू करण्यात यश आले आहे.

राजेंद्र बाईत

दरड कोसळल्याने हा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला या मार्गावरील सर्व वाहतूक आंबाघाट मार्गे वळवण्यात आली.

राजापूर : तालुक्यासह कोकणाला पश्चिम महाराष्ट्राला जोडणाऱ्या अणुस्कुरा घाटात पडलेली दरड युद्ध पातळीवरील प्रयत्नांती बाजूला करण्यात सार्वजनिक बांधकाम विभागासह (Public Works Department) सहकारी यंत्रणेला अखेर यश आले आहे. रस्ता वाहतुकीसाठी मोकळा झाला असून तब्बल २४ वीस तासांनंतर घाटमार्गातून (Anuskura Ghat) वाहतूक सुरू झाली आहे. घाटमार्ग मोकळा करण्यासाठी दिवसभर राबत योगदान देणाऱ्या साऱ्यांचे कौतुक केले जात आहे.

शुक्रवारी (ता. १४) सायंकाळी या मार्गावरील एका बाजूची दगड व माती काढून एकेरी वाहतूक सुरू करण्यात यश आले आहे. सुमारे २१ तासांनी अणुस्कुरा घाटातून दुचाकी व छोट्या वाहनांची वाहतूक सुरू झाली आहे. घाटातील दरड व माती काढण्याचे काम शनिवारीही सुरू राहणार असून सायंकाळपर्यंत हा घाट वाहतुकीसाठी पूर्ण सुरू केला जाईल, असा दावा बांधकाम विभागाकडून करण्यात आला आहे.

गुरुवारी सायंकाळी राजापूर शहर आणि तालुका परिसरात मुसळधार पाऊस झाला. या पावसामुळे अणुस्कुरा घाटात दरड कोसळली व या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली. घाटातील रस्त्याच्या डोंगरावरील माथ्यावरून भले मोठे दगड व माती रस्त्यावर आल्याने रस्ता वाहतुकीसाठी बंद झाला. सायंकाळी घाटात दरड कोसळल्याची माहिती मिळताच सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता शंतनू दुधाडे, शाखा अभियंता स्वप्नील बावधनकर यांनी आपल्या टीमसह घटनास्थळी धाव घेतली. तत्काळ ठेकेदार उपेंद्र शेटये यांना त्यांची टीम व आवश्यक ते साहित्य घेऊन बोलावण्यात आले व रात्रीच दरड हटविण्याचे काम हाती घेण्यात आले.

या ठिकाणी अडथळा ठरणारे दगड ब्लास्टिंग करून फोडून काही दगड फोडून बाजूला करण्यात आले. मात्र रात्री पावसामुळे दरड हटविण्यास अडचणी येत होत्या. रात्रीच राजापूर पोलिस निरीक्षक राजाराम चव्हाण, रायपाटण दूरक्षत्राचे पोलिस हवालदार कमलाकर तळेकर, पोलिस नाईक सचिन वीर, पोलिस शिपाई कोळी, कात्रे, माने, बळीप आदी देखील घटनास्थळी पोहचले व दरड काढण्याच्या कामाबाबत, वाहतूक अन्य मार्गाने वळविण्याबाबत नियोजन केले.

दरड कोसळल्याने हा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला या मार्गावरील सर्व वाहतूक आंबाघाट मार्गे वळवण्यात आली. बांधकाम विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांसह पोलिस प्रशासन या ठिकाणी जातिनीशी लक्ष ठेऊन आहेत. घाटातून मोठमोठ्या दगडी रस्त्यावर आल्याने रस्यावरही मोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे कामालाही वेळ लागत आहे. मात्र प्रशासनाकडून या परिस्थितीत काम युद्धपातळीवर सुरू आहे. तहसीलदार शीतल जाधव यांनी आज सकाळी घटनास्थळी भेट देत पाहाणी केली.

आज सायंकाळपर्यंत काम पूर्ण होणार

सायंकाळी या मार्गावर एकेरी वाहतूक सुरू करण्यात आली आहे. मात्र तरीही अद्याप दरडीचा काही भाग काढणे बाकी असून उद्याही ही हे काम सुरू रहाणार आहे. शनिवारी सायंकाळ पर्यंत पूर्णपणे दरड, माती व दगड बाजूला करून हा रस्ता निर्धोकपणे वाहतुकीला सुरू करण्याचा प्रयत्न असल्याचे बांधकाम विभागाकडून सांगण्यात आले. सध्या केवळ छोट्या वाहनांसाठी एकेरी वाहतूक सुरू करण्यात आली असून वाहन चालकांनी घाटातून वाहन चालविताना दक्षता घ्यावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ठाकरे गट, काँग्रेस आणि भाजप आमनेसामने! मतदार कुणाकडे झुकणार? वाचा BMC निवडणुकीत अंधेरी पश्चिमचे समीकरण

Who Is Vishal Jaiswal : एक गुगली अन् विराट स्टंप आऊट! कोहलीसह Rishabh Pant ला शतकापासून रोखणारा विशाल जैस्वाल नेमका कोण?

Vijay Hazare Trophy : भारतीय संघात परतला अन् Rinku Singh सूसाट सुटला... १५ चेंडूंत ६८ धावांसह ठोकले वादळी शतक

Vijay Hazare Trophy: पृथ्वी शॉ आक्रमक मूडमध्ये... वादळी खेळीसह महाराष्ट्राच्या विजय पक्का केला, ऋतुराज गायकवाडही बरसला

Latest Marathi News Live Update : रांजणगाव एमआयडीसी गोडाऊन चोरीचा गुन्हा 72 तासांत उघड; 68 लाखांचा मुद्देमाल जप्त

SCROLL FOR NEXT