only 207 schools are open from in ratnagiri and four teachers report are corona positive in ratnagiri
only 207 schools are open from in ratnagiri and four teachers report are corona positive in ratnagiri 
कोकण

रत्नागिरीत केवळ २०७ शाळांमध्येच विद्यार्थी हजेरी लावणार

सकाळ वृत्तसेवा

रत्नागिरी : कोरोनामुळे बंद पडलेले प्रत्यक्ष शिकवण्याचे कामकाज सोमवारपासून सुरू होत आहे. जिल्ह्यात ४५८ पैकी २०७ शाळांमध्ये विद्यार्थी हजेरी लावणार आहेत. कोरोनाच्या भीतीमुळे ८३ हजार ९०० पैकी २ हजार २८१ विद्यार्थ्यांना पालकांनी संमतिपत्रे दिली आहेत. त्यामुळे ६० टक्‍के शाळांचे कामकाज पालकांच्या संमतिपत्रावर अवलंबून आहे.
मुंबई, पुणे येथे कोरोनाचे रुग्ण वाढत असल्यामुळे तेथील प्रशासनाकडून सावधगिरीची भूमिका घेतली आहे.

रत्नागिरीत कोरोना रुग्णांचे प्रमाण कमी असले तरीही पालकांमध्ये भीती आहे. त्यामुळे ९ वी ते १२ वीच्या विद्यार्थ्यांना शाळेत पाठविण्यासाठी संमतीच दिली गेलेली नाही. प्रत्यक्ष शिकवण्याचे कामकाज सुरू करण्यासाठी माध्यमिक शाळा सज्ज झाल्या आहेत. विद्यार्थ्यांना शाळेत पाठविताना पालकांचे संमतिपत्र आवश्‍यक आहे. 

रविवारी सायंकाळपर्यंत जिल्ह्यातील २ हजार २८१ पालकांनीच संमतीपत्रे शाळांकडे सादर केली होती. काही पालक शाळेच्या दिवशी संमतीपत्रे देतील असा अंदाज आहे. तरीही शाळांचे प्रत्यक्ष शिकवणीचे काम सुरू होण्याचा आकडा ४० टक्‍केच आहे. पालकांकडूनही म्हणावा तसा प्रतिसाद मिळालेला नाही. रत्नागिरी तालुक्‍यात सर्वाधिक माध्यमिक शाळा आहेत; मात्र इतर तालुक्‍यांच्या तुलनेत अवघ्या ६० पालकांनीच संमती दिली आहे.

शाळेत आलेल्या विद्यार्थ्यांना व शिक्षकांना मास्क बंधनकारक असून सोशल डिस्टन्स ठेवायचा आहे. मुलांची बैठक व्यवस्थाही अंतर राखून करावयाची आहे. शाळेत उपस्थित राहण्यापूर्वी शिक्षकांना कोरोना चाचणी आवश्‍यक होती. त्यानुसार ५,५९० शिक्षकांपैकी २ हजार ५९५ शिक्षकांनी कोरोना चाचणी केली. त्यामध्ये १,०५३ आरटीपीसीआर तर १,५३८ शिक्षकांनी ॲण्टिजेन चाचणी केली होती. संगमेश्‍वर तालुक्‍यातील ३ आणि खेड तालुक्‍यातील १ शिक्षक कोरोनाबाधित आढळले आहेत.
 
शाळा सुरू करताना आणि वेळापत्रक ठरवताना लवचिकता ठेवली आहे. पालकांची संमती मिळेल तशी शाळा सुरू करावी अशा सूचना दिल्या आहेत. त्यासाठी पालकांवर बंधने आणली जाणार नाहीत. तशा सूचना शिक्षण विभागाच्या सचिवांनी दिल्या आहेत.

- निशादेवी वाघमोडे, शिक्षणाधिकारी

तालुकानिहाय  संमतिपत्रे

तालुका             संमतिपत्रे
मंडणगड              २४५
दापोली                 ४००
खेड                     ३२२
चिपळूण               २९३
गुहागर                 ३३८
संगमेश्वर               ३९७
रत्नागिरी                 ६०
लांजा                   १०९
राजापूर                ११७

संपादन - स्नेहल कदम 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024, RCB vs CSK: चेन्नईचा 17 व्या हंगामातील प्रवास थांबला! धोनीचीही कारकिर्द संपली? सामन्यानंतरचा पाहा Video

Loksabha Election 2024 : हुश्श..! प्रचार संपला, राज्यात तोफा शांत, तलवारी म्यान

IPL 2024: RCB चा आनंद गगनात मावेना! प्लेऑफमध्ये पोहचताच केला जोरदार जल्लोष, पाहा Video

‘चार सौ पार’ पासून बहुमताच्या आकड्यापर्यंत

सत्ता ठरवणारा उ त्त र रं ग

SCROLL FOR NEXT