onset of continuous rain in Khed then farmer happy 
कोकण

शेतकरी सुखावला ;अखेर खेडमध्ये संततधार पावसाला सुरुवात....

सकाऴ वृत्तसेवा

खेड (रत्नागिरी ): अखेर खेडमध्ये संततधार पावसाने सुरुवात केली असल्याने गेले काही दिवस मुसळधार पावसाच्या प्रतिक्षेत असलेला शेतकरी सुखावला आहे. मान्सुन सक्रिय होताच शेतीच्या लावणीपुर्व मशागतीला सुरवात झाली आहे. पेरणी झालेल्या शेतांमध्ये आता वाफे  रुजले असल्याने सगळीकडे निसर्गाने गालीचा पसरल्याचे जाणवू लागले आहे. पाऊस असाच सुरु राहिला तर येत्या आठ दिवसात लावणीला सुरवात करणे शक्य होणार आहे. 


३ जून रोजी झालेल्या निसर्ग वादळापासून खेडमध्ये पाऊस सुरु झाला होता. परंतु कोसळणाऱ्या पावसाला हवा तसा जोर नसल्याने शेतीच्या मशागतीची कामे रेंगाळली होती, मात्र आता खन्या अर्थाने तालुक्यात मान्सून सक्रिय झाला असल्याने शेतक-्यांनी लावणीपुर्व मशागतीला सुरवात केली आहे आज सकाळ पासून कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे उन्हाळ्यात कोरड्या पडलेल्या नद्या, नाले देखील पुनर्जीवित झाले आहेत. त्यामुळे नद्या नाल्यांची थांबलेली खळखळ  पुन्हा ऐकू यायला लागली आहे. मान्सुनच्या आगमनामुळे ग्रामीण भागातील पाणीटचाईचा प्रश्नही निकाली निघालाअसल्याने पाण्यासाठी वणवण भटकणाऱ्या ग्रामस्थाची भटकंती थांबली आहे.

खेड शहरालगत वाहणाऱ्या जगबुडी आणि नारंगी या दोन्हीं नद्यांच्या पाण्याची  पातळी उन्हाळ्यात  कमालीची कमी झाली होती मात्र आता पावसाला सुरवात झाली असत्याने या दोन्ही नद्यांच्या पाण्याची पातळी वाढू लागली आहे.  पावसाळ्यात जगबुडी नदीचे पाणी बाजरात घुसण्याची शक्यता असते त्यामुळे नदीकिनारी दुकाने असणाऱ्या व्यावसायिकांनी आपली दुकाने सुरक्षित स्थळी हलविली आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Accident News : एक ट्रक उलटला, पाठीमागून ४ ट्रक, एक बस आणि कारने धडक दिली; दोघांचा मृत्यू, १६ जण जखमी

RTE Admission 2026: खाजगी शाळांमध्ये मोफत शिक्षणासाठी लवकरच अर्ज प्रक्रिया सुरू होणार; मुलांचे वय किती असावे? वाचा सविस्तर माहिती

Thackeray Brothers Alliance : जागावाटप पूर्ण, कोणत्याही क्षणी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा; राजकीय घडामोडींना वेग, महत्त्वाची अपडेट समोर...

किशोरी शहाणेची खास आहे लव्हस्टोरी! कसं झालं नावाजलेल्या दिग्दर्शकासोबत लग्न? बॉलिवूडच्या 'या' अभिनेत्याने केलेली मध्यस्थी

Google 67 Search Meme : गुगलवर 67 सर्च करताच का हलू लागते स्क्रीन ? एकदा ट्राय तर करुन बघा; मजेशीर आहे Word of Year कहाणी

SCROLL FOR NEXT