कोकण

रत्नागिरीत भाजप कार्यकर्त्यांच्या सभेमध्ये शिवसेनाविरोधी सुर

राजेश शेळके, राजेश कळंबटे

रत्नागिरी - गेल्या साडेचार वर्षात खासदारांनी एक रुपयांचा निधी उपलब्ध करुन दिलेला नाही. त्यामुळे निवडणुकीत खासदार विनायक राऊत यांना मदत करणार नाही. वेळप्रसंगी घटक पक्षाच्या उमेदवाराला मदत करु, असा इशारा भाजप कार्यकर्त्यांनी आमदार प्रसाद लाड यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत दिला.

सिंधुदुर्गपाठोपाठ रत्नागिरीत झालेल्या भाजप कार्यकर्त्यांच्या सभेमध्ये शिवसेनाविरोध सुर उमटले. युतीची भुमिका मांडण्यासाठी आमदार प्रसाद लाड, जिल्हाध्यक्ष बाळ माने, राजन तेली, प्रमोद जठार, सतिश शेवडे, अशोक मयेकर यांच्यासह कार्यकारिणीतील शेकडो सदस्य उपस्थित होते.

मागील निवडणुकीत भाजपने प्रामाणिक काम केले; परंतु पाच वर्षांमध्ये पंतप्रधानांपासून भाजपच्या नेत्यांवर शिवेसनेकडून टिका होत आहे. जाकिमिर्‍यासारख्या ग्रामपंचायतीत बाळ माने यांच्या वहिनी सरपंच होऊ नयेत यासाठी सदस्यांना आपलेसे करत शिवसेनेने त्यांना पराभूत केले. या परिस्थितीत दुखावलेली भाजपची मने पुन्हा कशी जुळतील, असा प्रश्‍न भाजप कार्यकर्त्यांनी उपस्थित केला.

रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात मित्रपक्ष शिवसेनेचा उमेदवार नसला तरीही भाजपच्या घटकपक्षाचा उमेदवार रिंगणात आहे. वेळ पडल्यास आम्ही त्यांना मदत करु, अशी भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.

युतीबाबत पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड रोष आहे. खासदार विनायक राऊत आणि आमदार उदय सामंत यांनी दिलेल्या वागणुकीबाबतची आम्ही नाराज आहोत. मुख्यमंत्र्यांशी बोलून यापुढे ग्रामपंचायतीपासून जिल्हा परिषद, पंचायत समिती, पालिका आदीच्या सत्तेत भाजपला सामिल करण्याची हमी सेनेकडून घेऊ, असा शब्द मी देत आहे. युतीचा धर्म मात्र पाळावा लागले. 

- प्रसाद लाड, भाजप आमदार 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Garden Waste Scam : पुणे महापालिकेच्या उद्यान कचरा प्रकल्पात ३८ कोटींचा गैरव्यवहार? माजी नगरसेवकांचा ठेकेदारावर गंभीर आरोप

Police Negligence: संशयिताऐवजी भलत्यालाच अटक; ज्येष्ठाची ८८ दिवस कारागृहात ससेहोलपट ; राष्ट्रवादीचे प्रवक्ते विकास लवांडे यांचा आरोप

NEET Protest: बिहार सरकार आंदोलकांसमोर झुकलं! गुन्हे मागे घेण्याचा निर्णय, अटकेत असलेल्यांची सुटका

RTE Admissions Probe: आरटीई प्रवेशातील गैरप्रकारांवर सर्वत्र चौकशी; जिल्हा परिषद अध्यक्ष वीरधवल जगदाळे यांची सभेत ग्वाही

Pune HCMTR Ring Road : पुण्यातील वाहतूक प्रकल्पांना गती; एचसीएमटीआर, रिंगरोड व पाताळलोक बोगद्यांसाठी मुख्यमंत्र्यांचे स्पष्ट आदेश

SCROLL FOR NEXT