Oppose To Stay Mother And Girl In Home Who Came From Gujrat  
कोकण

धक्कादायक ! गुजरातवरून आलेल्या मायलेकींना घरात घेण्यास विरोध 

सकाळवृत्तसेवा

सावंतवाडी ( सिंधुदुर्ग) - कोरोनात मोठ मोठी शहरे उजाड होत असल्याने अनेकांना आपल्या गाव अन्‌ घराची ओढ लागली आहे; मात्र काही नागरिकांत अशा परतलेल्या लोकांबद्दलची मानसिकताच बदलून गेली आहे. अशाच एका प्रकारामुळे येथे गुजरातवरून परतलेल्या मायलेकींना उघड्यावर राहण्याची वेळ आली आहे. घर मालकाने त्यांना घरात घेण्यास विरोध केल्याने कालची रात्र त्यांनी कुटीर रुग्णालयातील बाकावर बसून काढली; मात्र प्रशासनाने त्यांची व्यवस्था करावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांमधून होत आहे. 

लॉकडाऊन शिथील करून परत जिल्हा व परराज्यातील अडकलेल्या लोकांना जिल्ह्यात परतण्याची मुभा शासनाने दिली असली तरीही परतलेल्या लोकांना स्वीकारण्यास मात्र स्थानिक तयार नसल्याचे पुन्हा एकदा निदर्शनास आले आहे. गुजरात येथील ग्रीन झोनमधून सावंतवाडीत परतलेल्या एका महिलेसह तिच्या मुलीला घरात घेण्यास घर मालकाने विरोध केल्यामुळे त्या दोघांना अक्षरशः उघड्यावर राहावे लागत आहे.

कालची रात्र या मायलेकींनी सावंतवाडी रुग्णालयातील बाकावर बसून काढावी लागली. तर सकाळपासून शहरात रस्त्यालगत ती दोघे बसून आहेत. गुजरात येथे त्या औषध आणण्यासाठी ती गेली होती; मात्र लॉक डाऊनमुळे ती गुजरातमध्ये अडकून पडली होती. आता संचारबंदी शिथिल झाल्यामुळे ई पास द्वारे ती सावंतवाडीत परतली. त्यांना गृह विलगीकरण करण्याचे पत्र तेथील प्रशासनाने दिले आहे; मात्र सालईवाडा भागात ज्या घरात ती लोक भाड्याने राहत होते

त्या घरमालकाने त्यांना त्यांच्या घरात येण्यास अटकाव केल्याने त्यांना अक्षरशः रस्त्यावर येण्याची पाळी आली आहे. तर गृह विलगीकरणचे पत्र असल्याने प्रशासनाने त्यांना संस्थात्मक क्वारंटाईन करण्यास मनाई केली आहे. त्यामुळे या दोन मायलेकींची प्रशासनाने तत्काळ व्यवस्था करावी, अशी मागणी आता स्थानिक नागरिकांमधून होत आहे. यापुढे ही अनेकांसमोर घरी परतताना मोठ्या मानसिक तणाव्यातून सामोरे जावे लागणार आहे हे आताच्या परिस्थीतीतुन दिसून येते. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Devendra Fadnavis: रेल्वेचा प्रश्न सोडवला आता पुढचा प्रश्न पाण्याचा! मुख्यमंत्री म्हणाले, दुष्काळ काय असतो हेसुद्धा मराठवाडा विसरून जाईल

Latest Marathi News Updates : ठाकरेंच्या शिवसेनेकडून नाशिकमध्ये स्व.मीनाताई ठाकरे यांच्या फोटोला दुग्धभिषेक

Mohol News : मोहोळ पोलिसांनी उघड केल्या दोन चोऱ्या, लाखाचा माल हस्तगत चोरटा पोलीसांच्या ताब्यात

Nashik News : ५ कोटींचे बक्षीस: नाशिकच्या ग्रामपंचायतींना समृद्ध होण्याची सुवर्णसंधी

Onion Production : आंध्र प्रदेशच्या धर्तीवर अनुदान मिळणार? कांदा प्रश्नावर समितीकडून सकारात्मक हालचाल

SCROLL FOR NEXT