Sindhudurg Rain esakal
कोकण

Sindhudurg Rain : सिंधुदुर्गात मुसळधार पाऊस; पुढील तीन दिवस ऑरेंज अलर्ट, तर 1 जुलैला रेड अलर्ट जाहीर

जिल्ह्यातील वेंगुर्ले तालुक्याला मुसळधार पावसाने चांगलेच झोडपून काढले. या भागात जोरदार पाऊस सुरू आहे.

सकाळ डिजिटल टीम

हवामान विभागाने सिंधुदुर्गला काल रेड अलर्ट जाहीर केला होता. २८ ते ३० जूनपर्यंत ऑरेंज अलर्ट तर १ जुलैला रेड अलर्ट जाहीर केला आहे.

वैभववाडी : जिल्ह्यात मुसळधार पाऊस (Sindhudurg Rain) सुरू असून, वेंगुर्लेला पावसाने अक्षरक्षः झोडपून काढले. त्यामुळे या भागातील कित्येक एकर शेती पाण्याखाली गेली आहे. याशिवाय जिल्ह्याच्या उर्वरित भागातदेखील मुसळधार पाऊस सुरू आहे. जोरदार पावसामुळे नद्या दुथडी भरून वाहत आहेत. दरम्‍यान, रखडलेल्या भातरोप लागवडीला वेग आला आहे. हवामान विभागाने (Meteorology Department) पुढील तीन दिवस आँरेज अलर्ट तर १ जुलैला रेड अलर्ट जाहीर केला आहे.

जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाच्या हलक्या सरी सुरू होत्या. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण होते; परंतु काल (ता. २६) पासून जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला. काल सकाळपासून जिल्ह्यात पावसाच्या जोरदार सरी बरसत होत्या. त्यानंतर सायंकाळी पावसाचा जोर अधिकच वाढला. जिल्ह्यातील वेंगुर्ले तालुक्याला मुसळधार पावसाने चांगलेच झोडपून काढले. या भागात जोरदार पाऊस सुरू आहे.

या भागातील नदी, ओहळ दुथडी भरून वाहत आहेत. या तालुक्यातील मातोंड आणि तुळस येथील कित्येक एकर भातशेती पाण्याखाली गेली आहे. याशिवाय सावंतवाडी, कुडाळ, कणकवली, वैभववाडी, दोडामार्ग, देवगड तालुक्यांतदेखील पावसाच्‍या जोरदार सरी पडत आहेत. मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील तेरेखोल, भंगसाळ, गड, जानवली, शुक, शांती या सर्व नद्या दुथडी भरून वाहत आहेत. पावसाचा जोर कायम राहिल्यास जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे.

चांगल्या पावसामुळे नियमित भातरोप लागवडीला सुरुवात झाली आहे. आतापर्यंत पावसामुळे भातपिक लागवड रखडली होती; परंतु आता भातरोप लागवडीला गती आली आहे. शेतमळ्यांमध्ये लागवडीची गजबज दिसून येत आहे. दरम्यान, हवामान विभागाने पुढील चार दिवस जिल्ह्यात आँरेज अलर्ट जाहीर केला आहे.

तीन दिवस ऑरेंज; १ जुलैला रेड अलर्ट

हवामान विभागाने सिंधुदुर्गला आज रेड अलर्ट जाहीर केला होता. २८ ते ३० जूनपर्यंत ऑरेंज अलर्ट तर १ जुलैला रेड अलर्ट जाहीर केला आहे. या कालावधीत जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे. याशिवाय काही भागांत जोरदार वारे वाहण्याचा देखील अंदाज आहे.

...तर पूरस्थिती

जिल्ह्यात सध्या जोरदार पाऊस पडत असून, जिल्ह्यातील सर्वच नद्यांच्या पाणी पातळीत प्रचंड वाढ झाली आहे. त्यामुळे पावसाचा जोर कायम राहिल्यास जिल्ह्याच्या काही भागांत पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे.

तालुकानिहाय पाऊस

तालुका मि.मी

  • देवगड ५३.३

  • मालवण ७५.१

  • सावंतवाडी ८८.३

  • वेंगुर्ले १०८

  • कणकवली ६८.२

  • कुडाळ ८३.२

  • वैभववाडी ५७.६

  • दोडामार्ग ७४.६

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT