orders from CEO of zilla parishad for employees in ratnagiri 
कोकण

बेशिस्त कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई होणार ; रत्नागिरीत जि. प. सीईओंचे आदेश

सकाळ वृत्तसेवा

रत्नागिरी : जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी कार्यालयीन शिस्तीचे पालन करा, असे पत्र जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. इंदूराणी जाखड यांनी सर्व पंचायत समित्यांना पाठवले आहे. सूचना देऊनही वर्तनात सुधारणा न झाल्यास संबंधितांविरोधात कडक कारवाई केली जाईल, असा सूचना दिल्या आहेत. 

तालुकास्तरीय आढावा बैठकीवेळी काही तालुक्‍यातील ग्रामपंचायत कार्यालयाला डॉ. जाखड यांनी भेटी दिल्या. तेव्हा कार्यालयीन वेळेत ग्रामपंचायत कार्यालय बंद असल्याचे निदर्शनास आले. ही बाब योग्य नाही. ग्रामसेवकांच्या वर्तनामुळे ग्रामस्थांमार्फत बऱ्याच वेळेस विनाकारण तक्रारी प्राप्त होऊन शासकीय कार्यालयाची प्रतिष्ठा मलीन होते. बऱ्याच ग्रामपंचायतींमधील ग्रामसेवक, कर्मचारी, संबंधित गटविकास अधिकारी, पं. स. यांची परवानगी न घेता, अथवा कार्यालयास न कळविता जि. प. मुख्यालयात वैयक्तिक कामानिमित्त उपस्थित असतात, हे त्यांच्या निदर्शनास आले आहे. याबाबत संबंधितांना समज देण्याच्या सूचनाही त्यांनी काढल्या आहेत.

ग्रामसेवक त्यांच्या वैयक्तिक कामानिमित्त जिल्हा परिषद कार्यालयात उपस्थित राहाणार असतील अथवा अन्य कारणाने ग्रामपंचायतीत अनुपस्थित राहणार असतील तर त्याबाबत रजेचा अर्ज संबंधित पं. स. कार्यालयाला सादर करणे बंधनकारक आहे. कार्यालयीन कामानिमित्त बाहेर जाणार असतील, तर तशी नोंद ग्रामसेवकांनी हालचाल नोंदवहीत केली पाहिजे. यानुसार पंचायत समितीने ग्रामपंचायतींमधील ग्रामसेवक व कर्मचारी यांना सूचना द्याव्यात. संबंधितांच्या वर्तनात सुधारणा न झाल्यास नियमानुसार कारवाई प्रस्तावित करावी, अशा सक्त सूचना गटविकास अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. 

ग्रामस्थांशी सुसंवाद साधा 

ग्रामस्थांशी सुसंवाद नसल्याने तक्रारी प्राप्त होतात. याकरिता सर्व ग्रामपंचायत कर्मचारी व ग्रामसेवकांनी ग्रामपंचायतीत आलेल्या अभ्यांगतांना सौजन्याची वागणूक द्यावी व आपले ग्रामपंचायतीबाबत कोणतीही तक्रार उद्‌भवणार नाही, याची दक्षता घ्यावी, असेही बजावले आहे. 

कामकाजावेळी कार्यालय बंद नको 

एकापेक्षा अधिक ग्रामपंचायतींचा कार्यभार असल्यास, प्रत्येक ग्रामपंचायतीत उपस्थित राहावयाचे दिवस व कालावधी याबाबत ग्रामपंचायतीबाहेर तसा फलक लावावा. अतिरिक्त कार्यभार असलेल्या ग्रामपंचायत कार्यालयात उपस्थित राहत असल्याची नोंद केली पाहिजे. कोणत्याही परिस्थितीत प्रत्यक्ष कामकाजावेळी ग्रामपंचायत कार्यालय बंद राहणार नाही, याची दक्षता घ्यावी, अशा सूचना दिल्या आहेत. 

एक नजर -

  • डॉ. जाखड यांनी दिल्या काही ग्रा. पं. कार्यालयाला भेटी 
  • कार्यालय बंद असल्याचे आले निदर्शनास 
  • ग्रामसेवकांच्या वर्तनामुळे विनाकारण तक्रारी प्राप्त 
  • शासकीय कार्यालयाची प्रतिष्ठा होते मलीन 
  • वर्तनात सुधारणा न झाल्यास नियमानुसार कारवाई 
     

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Flight Guidelines: विमानाच्या उड्डाणासाठी नवे नियम जाहीर! पायलटचा निर्णय अंतिम असणार; दबाव टाकणाऱ्यांवर कठोर कारवाई

Manchar Crime : मंचर येथे प्रांत अधिकारी गोविंद शिंदे यांना दोन लाख रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडले; एसीबीची कारवाई

Mumbai Local Mega Block : कांदिवली-बोरिवलीदरम्यान रेल्वेचा विशेष मेगाब्लॉक; लोकल वाहतुकीत बदल

Talegaon Station News : तळेगाव-चाकण-शिक्रापूर रस्तेकामाचा अंतिम अध्यादेश जारी; डीबीओटी तत्वावर होणार काम

Maharashtra: आधार आणि किसान आयडी ब्लॉक, सरकारी योजनांपासून दूर ठेवणार अन्...; शेतरस्त्यावर अतिक्रमण केल्यास कठोर कारवाई होणार

SCROLL FOR NEXT